प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील मोरेवाडी परिसरात असलेल्या म्हसोबाचा ओढ़ा येथील विहीरीत संजय बाळासो मोरे (रा.राजेंद्रनगर ,कोल्हापूर ) यांचा मृतदेह सापडला. हा प्रकार शुक्रवार (दि.17) रोजी सकाळी उघडकीस आला.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
मोरेवाडी येथे रहात असलेले शेतकरी अरविंद नामदेव भिलुगडे हे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास आपल्या भारती नगर म्हसोबाचा ओढ़ा येथील शेतात पिकाला पाणी पाजण्यासाठी विहीरी जवळ मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्या विहीरीत संजय मोरे यांचा मृतदेह आढ़ळल्याने त्यांनी याबाबतची वर्दी करवीर पोलिस ठाण्यात दिली.
Tags
कोल्हापूर