प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- मध्यप्रदेश राज्यातील बेलहाई,सतना येथील परप्रांतिय कामगार मनिषकुमार साकेन (वय 20) याचा शुक्रवार (दि.10) रोजी रात्री दिडच्या सुमारास डेल्टा इरिगेशन इंडिया L.L.P. फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल या कंपनीत OPVC मशिनवर हेल्पर म्हणुन काम करीत असताना मशोन मध्ये बिघाड होऊन पीव्हीसी पाईपचा स्फोट होऊन जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा गेल्या चार वर्षांपासून ह्या कंपनीत कामाला होता.तो त्याच काम करीत रहाण्यास होता.या घटनेची माहिती गोकुळ शिरगांव पोलिसांना समजताच मृताची माहिती घेऊन पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
ह्या घडलेल्या प्रकाराने मृताचे नातेवाईक आणि त्यांच्यात परस्पर मिटविण्याच्या चर्चा सीपीआर आवारात बराच वेळ चालू होती.