प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - केंद्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली.शपथविधी झाला पण पालकमंत्री पदाचा निर्णय होईना.परवा नांदणी येथे कार्यक्रम झाला त्या वेळी मंत्री महोदय कोल्हापुर येथे विमानतळावर दाखल झाले होते.त्या वेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी कोल्हापुरचे पालकमंत्री म्हणुन मंत्री हसनसो मुश्रीफ यांनी स्वागत करून वेळ निभावून नेली.पण 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने या वेळी पालकमंत्री म्हणुन ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होणार या चर्चेला उधाण आले आहे . कोल्हापूर बरोबर सांगली या जिल्हयासह काही राज्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय झाला नसल्याने तो येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री पदासाठी मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसनसो मुश्रीफ यांच्यात रस्सीखेच चालू आहे.त्यामुळे या दोन मंत्र्यात कोल्हापूरचा पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागते यांची वाट पहावी लागेल.मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगली जिल्हा मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.तर शिंदे गट मंत्री प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्हा मिळावा यासाठी आग्रही आहे.