प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
गगनबावडा - तिसंगी येथे रहात असलेल्या घरात तणनाशक प्राशन केलेल्या प्रकाश बाळु पाटील (वय 54) यांचा उपचार चालू असताना मंगळवार(दि.14) रोजी सकाळी सीपीआर मध्ये मृत्यु झाला.त्यांनी 12 जानेवारीला तणनाशक प्राशन केले होते.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हे रिक्षा चालक असून ते आपल्या कुंटुबिया समवेत कोल्हापुरात भाड्याने खोली घेऊन रहात होते.त्यांनी आपल्या गावी जाऊन तणनाशक प्राशन केल्याने त्यांना त्रास झाल्याने उलट्या करु लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात आई,भाऊ ,पत्नी ,एक मुलगा आणि दोन मुली आहेत.