प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणुन मोटारसायकल चोरटा साहिल अशोक शिंदे (वय 20.रा.पासारवाडी ,ता.आजरा ) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन 5 लाख रुपये किमंतीच्या 10 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याच प्रमाणे वाहन चोरीचे पोलिस रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीच्या घटना स्थळी भेट देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.या अनुशंगाने तपास पथके तयार करून वाहन चोरीचा तपास चालू केला असता सदर पथकाने वाहन चोरीच्या घटना स्थळी भेटी देऊन गुन्हयां घडलेल्या ठिकाणा पासून सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत असताना दोन तरुण चोरीतील यामाहा मोटारसायकल घेऊन गडहिग्लज येथील एम.आर.चौक येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शुक्रवार (दि.17) रोजी एम.आर.चौक ,गडहिग्लज येथे सापळा रचून विना नंबर प्लेट मोटारसायकल घेऊन आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील RX100 यामाहा ही मोटारसायकल चोरीची असून गडहिग्लज पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.त्यांनी नावे पत्ता विचारली असता ती अल्पवयीन असल्याचे समजले.त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कोल्हापुर जिल्ह्यातुन ग्रामीण भागातुन मोटारसायकल चोरल्याची कबुली देत त्या चोरलेल्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी आपला साथीदार साहिल शिंदे यांच्याकडे दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी साहिल शिंदे यांला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.दोन अल्पवयीन व साहिल शिंदे यांच्या कडुन 5 लाख रुपये किमंतीच्या 9 मोटारसायकलसह गुन्हयांत वापरलेली एक मोटारसायकल अशा 10 मोटारसायकल जप्त केल्या असून त्यांच्या कडुन गडहिग्लज येथे पाच ,आजरा येथे दोन,मुरगूड आणि नेसरी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक आणि गुन्हयांत वापरलेली एक अशा 10 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
दोन अल्पवयीन मुलासह साहिल शिंदे यांला पुढ़ील तपासासाठी गडहिग्लज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर सहा.पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.