स्व.बी.आर.पाटील यांना शोकसभेत आदरांजली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- ज्येष्ठ पत्रकार बी.आर .पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ .(मुंबई) कोल्हापूर शाखेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारत मंदीर हॉल ,खरी कॉर्नर येथे शोक सभा आयोजित केली होती.
या शोक सभेला पत्रकार,राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासह इतर मान्यंवर उपस्थित होते.
परखड वाणी आणि लेखणी यांच्या आधारे ज्येष्ठ पत्रकार बी आर पाटील यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण केला होता. त्यांच्या निधनामुळं पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. मात्र आताच्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवावा अशा भावना आज त्यांच्या शोकसभेच्या निमित्ताने विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित शोकसभेत या भावना व्यक्त झाल्या.
त्यांनी तब्बल ४५ वर्ष विविध स्थानिक वृत्तपत्र आणि पीटीआय आकाशवाणी या केंद्र सरकारच्या वृत्त संस्थांमध्ये ज्येष्ठ पत्रकार बी आर पाटील पत्रकारितेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले. याचबरोबर त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि विरोधी पक्ष नेते पदही भुषविले होते.२७ डिसेंबर रोजी वयाच्या ८० व्या वर्षी बी .आर .पाटील यांचं निधन झाले.यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोल्हापूर विभागासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी पाटील यांच्या निधनानिमित्त शोक सभा आयोजित केली होती.
प्रारंभी पाटील कुटुंबीयांसह उपस्थितांनी बी .आर .पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, माजी नगरसेवक आर .डी .पाटील, रवीकिरण इंगवले, लाला गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस, रवी कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, प्रा. निवास पाटील, अरूण शिंदे, अपर्णा पाटील, कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह मान्यवरांनी बी. आर. पाटील यांच्या पत्रकारितेचे तसंच स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे श्रेयस भगवान, सुरेश पाटील, कृष्णात चौगले, व्यंकाप्पा भोसले, रामचंद्र गुरव, अशोक देसाई, मंजित माने, चंद्रकांत साळोखे, सुरेश साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.