प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
पन्हाळा- पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी शिंदेवाडी येथील 21 शेळ्यांची चोरी झाली होती.या चोरीच्या गुन्हयांची नोंद 28/12/2024 रोजी पन्हाळा पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्हयांचा तपास पन्हाळा पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील समीर मुल्ला आणि रविंद्र कांबळे हे करीत असताना तपासा दरम्यान आजू बाजूच्या सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली असता त्यात एक चारचाकी आणि चार संशयीत वाहनाचा शोध घेऊन माजगाव ते चंदगड पर्यत असलेले 30 ते 35 सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींचा माग काढत आरोपींचा शोध घेत त्यांची नावे निष्पन्न झाल्याने यातील आरोपी 1) परशुराम मारुती पवार (वय 30 रा.तुड्ये ता.चंदगड) 2) मोहमद शाहीद मोहमद गौस काकर (वय 27.रा काकरगल्ली ,बेळगाव) 3) मेहबूब अब्दुल मुलतानी (वय 58.रा .गुंजानहट्टी ,ता.हुक्केरी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी शिंदेवाडी येथील शेतातील 21 शेळ्या मेंढ़या चोरल्याप्रकरणी दि.10/01/2025 रोजी अटक करून त्यांना पोलिस कोठडी मिळाली होती.या कालावधीत त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी राधानगरी तालुक्यातील राशीवडे येथे ही शेळ्या मेंढ़या चोरल्याची कबुली दिली असून या सराईत चोरट्यांकडून दोन लाख रुपये किंमतीची ओमनी कार आणि चोरलेल्या शेळ्या मेढ़या विक्री करुन आलेले 50 हजार रुपये असा एकूण 2 लाख 50 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,शाहुवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पन्हाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय बोंबले ,पोलिस उपनिरीक्षक महेश कौडुभैरी,सहा.फौजदार सिताराम डोईफोडे,पोलिस समीर मुल्ला ,रविंद्र कांबळे,डमाळे,सर्जेराव पाटील,विलास जाधव यांच्यासह चालक बोरचाटे व वायंदडे यांनी केली आहे.