प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- मोबाईल इंटरनेट संकेत स्थळावरून एका घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपी फिरोज शेख (रा. कोंढवा ,पुणे ) याला अटक केली आहे.
फिरोज शेख यांने हातकंणगले तालुक्यातील एका घटस्फोटित महिलेची 11तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 1 लाख 69 हजार रुपये असा एकूण 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सदर घटस्फोटित महिलेने फिरोज शेख हा मुलींची /महिलेंची ओळख करून फसवणूक करीत असे त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्याने 25 पेक्षा जास्त महिलेंची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
हातकणंगले तालुक्यातील एका घटस्फोटीत महिलेला एक लहान मुलगा असून त्याच्या भविष्याचा विचार करून आणि आपल्याला जोडीदार असावा असा विचार करून एका संकेतस्थळावर आपली माहिती पाठविली असता आरोपी याने रिक्व्हेस्ट पाठवून त्या महिलेला आणि तिच्या घरच्यांना पाच कंपन्यांची व्हेडरशिप असून इंडस्ट्रीयल कॉन्ट्रक्टर असल्याची खोटी माहिती देऊन ओळख करून घेऊन आपल्याबरोबर लग्न करण्याची पसंती दर्शवून महिलेला भुरळ पाडून तिच्याकडून एक लाख 69 हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख 25 हजार रुपये किमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणी पीडित घटस्फोटीत महिलेने जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके नेमून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या गुन्हाच समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे आणि मुंबई इथ आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.
दरम्यान हातकणंगले तालुक्यातील घटस्फोटीत महिलेची फसवणूक करणाऱ्या फिरोज शेख याला कोंढवा पुणे येथून आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या महिलेकडून घेतलेल्या रक्कमे पैकी एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे.त्याला पुढ़ील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.याचा पुढ़ील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्पणा जाधव ह्या करीत आहेत.
आरोपी फिरोज शेख हा मुळचा इंदापूरचा असून सध्या पुणे येथे कोंढ वा परिसरात रहात होता तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अमलदार विलास किरोळकर, सचिन पाटील, अमित सर्जे, सोमराज पाटील, योगेश गोसावी ,राजेंद्र वरंडेकर ,सुरेश पाटील, शिवानंद मठपती सायबर शाखेचे अतिश म्हेत्रे आणि सचिन बेंडखळे यांनी केली.