प्रेस मीडिया लाईव्ह :,
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिला जबरदस्तीने नशील्या गोळ्या चारल्याचेही पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी अनिकेत साताप्पा हेरवाडकर (वय २३, रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, कोल्हापूर) यास अटक केली आहे.
पीडित युवती अल्पवयीन असून तिचे शिक्षण चालू आहे . पीडित युवती व संशयित अनिकेत यांची वर्षभरापूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. सोशल मीडियावरून चॅटिंग करत होते. अनिकेत याने युवतीबरोबर लग्न करण्याची तयारी दर्शवली.
याबाबत फोनवरून चर्चा झाल्यानंतर ते कोल्हापूर शहरात भेटले. त्यानंतर अनिकेत याने पीडित युवतीला मी तुझ्याबरोबरच लग्न करतो, असे आमिष दाखवून २५ जुलै, २०२४ ते १२ जानेवारी, २०२५ या कालावधीत पीडित युवतीला शहरातील एका लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले. तसेच संशयिताने तिला आपल्या घरी बोलवून घरात कोणी नसताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेला त्याने जबरदस्तीने नशील्या गोळया खाण्यास भाग पाडले.
त्यानंतर संशयित आरोपी पीडित युवतीला टाळू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित युवतीने हा प्रकार आपल्या घरातील लोकांना सांगितला. त्यानंतर पीडित युवती करवीर पोलीस ठाण्यात जाऊन तिने पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी अनिकेत हेरवाडकर याला अटक केली आहे.
--------------------------------------
अश्लिल मॅसेज सोशल मिडीयावर व्हायलर करून महिलेची बदनामी.
करवीर पोलिसांनी तरुणाला अटक करून विनयभंगाचा गुन्हा दाखल.
कोल्हापूर- एका विवाहितेची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर अश्लिल मॅसेज, चॅटींग, फोटो आणि व्हिडीओ टाकणाऱ्या तरुणास करवीर पोलीसांनी अटक केली आहे. आकाश उर्फ ओंकार राजेंद्र गुरव(वय २४, रा.जगतापनगर, पाचगाव ता.करवीर ) असे त्या संशयीताचे नाव आहे. पिडीतेने १३ जानेवारी रोजी फिर्याद दिली होती.
पिडीत महिला शहरातच चहा नाष्टयाचा स्टॉल चालवते. त्यांची बदनामी करण्यासाठी संशयीत आरोपीने त्यांचे चोरून फोटो घेऊन त्यांची बदनामी करण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून पिडीतेला अश्लिल मेजेस व फोटा टाकून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पिडीतेने याबाबत करवीर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेऊन घडलेली हकीकत सांगितली. शिंदे यांनी संबंधीत तरुणास तातडीने अटक केली. त्याला पोलीस ठाण्यात आणून कसूच तपास केल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००च्या कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस पुढील तपास करीत आहेत.