प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवार(दि.30) रोजी राजारामपुरी आणि गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या 11 गावठी दारु हातभट्टीवर छापा टाकून 3 लाख 37 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून राजारामपुरी पोलिस ठाण्यात 07 आरोपी आणि गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात 04 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कोल्हापूर जिल्ह्यातील अवैद्य व्यवसाय सुरु असल्याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आणि त्यांच्या पथकानी माहिती काढ़ुन कारवाई करीत असताना या पथकातील पोलिसांना मोरेवाडी येथील कंजारभाट वस्ती आणि कणेरीवाडी येथे कंजारभाट वस्तीत पहाटेच्या सुमारास गावठी हातभट्टी दारु तयार करत असल्याची माहिती मिळाली.या मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी आपल्या पोलिस पथकासह (दि.30) रोजी पहाटेच्या सुमारास मोरेवाडीतील 07आणि कणेरीवाडी येथील 04 अशा एकूण 11गावठी दारु हातभट्टयावर कारवाई केली.सदर परिसरात दारु तयार करण्यासाठी वापरात असलेले 5,600 लि.कच्चे रसायन,1540 ,पक्के रसायन,592 लि.तयार गावठी दारु व इतर साहित्य असा एकूण 3 लाख 37 हजार 160 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.