आजाराला कंटाळून वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- करवीर  तालुक्यातील सोनाळी येथील विष्णु लक्ष्मण घाग (वय 95) यांनी गुरुवार(दि.23) रोजी सकाळी आठच्या सुमारास रहात असलेल्या घराच्या टेरेसवर लोखंडी पाईपला कासराच्या दोरीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्यांचा उपचार पूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत हे शेतकरी असून ते सतत आजारी असायचे .ते रोज सकाळी टेरेसवर जाऊन बसत असत.आज सकाळी नेहमी प्रमाणे टेरेसवर गेले होते.त्याच्या घरातील नातेवाईक कपडे वाळत घालण्यासाठी टेरेसवर गेले असता हा प्रकार निदर्शनास आला.

Post a Comment

Previous Post Next Post