प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- हॉकीस्टेडियम येथील ललीत अमृत शहा (वय 42.रा.हॉकीस्टेडियम जवळ,शत्रुंज सोसायटी,को.) यांचा मृतदेह निगडेवाडी उचगांव येथे नदीपात्रात मिळुन आला.त्यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार गुरुवार (दि.09) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हे व्यावसायिक असून गुरुवारी पहाटेच्या घरातून बेपत्ता झाले होते.त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते मिळुन न आल्याने याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली होती.त्यांचा मृतदेह निगडेवाडी उचगांव नदीपात्रात मिळून आल्याने याची माहिती गांधीनगर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला .याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिल्याने ते सीपीआर रुग्णालयात दाखल झाले.सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यांनी आजाराला कंटाळुन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. यांच्या पश्च्यात आई-वडील ,भाऊ ,पत्नी ,एक मुलगा आणि मुलगी आहे.