प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात ३१ डिसेंबर निमित्त मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मंगळवारी रात्री ११.४० च्या सुमारास राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना राजारामपुरी येथील ११व्या गल्लीमध्ये एक व्यक्ती गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे व कॉन्स्टेबल संदीप सावंत यांनी त्या परिसरात छापा मारला.या छाप्यात सनत प्रताप देशपांडे (वय ३४, रा.गुणगौरव अपार्टमेंट,राजारामपुरी ९ वी गल्ली) याला अटक करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ७८,२५० रुपये किंमतीचा ३ किलो गांजा सापडला.मिळालेला गांजा व त्याच्याकडील मोबाईल असा एकूण ८८,२५० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण,उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे,सहा. फौजदार समीर शेख,पोहेकॉ अरविंद पाटील,पो. कॉ संदीप सावंत,विशाल शिरगावकर,अमोल पाटील,सत्यजित सावंत,सुशांत तळप,नितीश बागडी,सुरेश काळे,सारिका गौतम व प्रियांका जनवाडे यांनी केली.