60 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पाच जणांच्या परप्रांतिय टोळीस अटक करून 60 लाख रुपये किमंतीच्या 7 चारचाकी आणि 5 दुचाकी जप्त करून या प्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील आरोपी नागेश हणमंत शिंदे (वय 30.रा.लोकमान्यनगर ,कोरोची),संतोष बाबासो देटके (वय 40.रा.तारळे,ता.पाटण) ,मुस्तफा सुपे महंमद (वय 50.रा.तुमकूर ),मुबारक खय्युमशहा खादरी (वय 54) व करीम शरीफ शेख (वय 64.दोघे रा.पी.एच.कॉलनी,तुमकूर)आणि इमामसाब खुलसाब मुलनवार (वय 45.रा.कुरपेटी ,गदग) यांना अटक केली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कोल्हापूर जिल्हयात होत असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी काही पथके तयार करून तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना माहिती मिळाली की,पोलिस रेकॉर्डवरील आरोपी नागेश शिंदे हा आपल्या साथीदारासह (दि.06 ) रोजी शिवाजी विद्यापीठ परिसरात असलेल्या जलसंपदा कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून नागेश शिंदे आणि त्याचा साथीदार संतोष देटके यांच्यासह त्यांच्या कडील अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा टेम्पो चोरीचा असल्याचे सांगितले.याची माहिती घेत असताना याची शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार तपास केला असता नागेश शिंदे हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेंगार असल्याने पोलिसांनी मोठ्या हुशारीने तपास करीत असताना त्यांने 5 मोटारसायकल चोरी केल्याचे सांगून 6 चारचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली.नागेश शिंदे यांने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्या इतर साथीदाराना कर्नाटकातुन ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रितपणे चौकशी केली असता या आरोपी कडुन 2 अशोक लेलंड टेम्पो,2 मारुती सुझुकी कंपनीच्या इको,1 बोलेरो आणि 1 हुंदयाई तसेच कागल येथे लक्ष्मीटेकडी जवळील हायवेवर (दि.08)रोजी इमामसाब मुलनवार कडुन 1 अशोक कंपनीचा चोरीतील ट्रक जप्त करण्यात आला.पोलिसांनी वरील सर्व आरोपीकडुन एकूण 60 लाख रुपये किमंतीच्या 7 चारचाकी आणि 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या आरोपी कडुन पोलिसांनी शिरोली एमआयडीसी,कागल , गांधीनगर,राजारामपुरी,शाहुपुरी,कुंरुंदवाड,जयसिंगपूर,कुर्डूवाडी या पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असलेला उघडकीस आणुन त्याच प्रमाणे शिरोळ,शहापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे असे एकूण बारा गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वरील आरोपी नागेश शिंदे यांच्यावर दुचाकी आणि चारचाकीचे 90 गुन्हे दाखल आहेत तर संतोष देटके यांच्यावर 06गुन्हे आणि चोरीचे वाहन विकत घेतल्या प्रकरणी करीम शेख यांच्यावर 04 गुन्हे दाखल आहेत.ही सर्व वाहने जप्त करून या गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे,पोलिस उपनिरिक्षक आतिश म्हेत्रे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.