प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथील दस्तगीर बाबासाहेब जमादार (वय 68.रा.वीर जिजामाता नगर, वडाळी चाळ ,एम.जी.रोड डोंगरी गिरगाव.मुळगाव टाकळवाडी.ता.शिरोळ).यांचा मुंबईला जाणारी रेल्वे पकडत असताना पडून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्यांचा उपचार चालू असताना रात्री अकराच्या सुमारास मृत्यु झाला.हा प्रकार मंगळवार (दि.21 ) रोजी आठच्या सुमारास असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत यांचा मुंबई येथे चारचाकी गाड्यांचा देवाण घेवाण चा व्यवसाय करत असून ते मुंबईतील नातेवाईकांच्या रहात होते.ते आपल्या मुळगावी अधुन मधुन येत असत.चार पाच दिवसांपूर्वी आपल्या मुळगावी आले होते.मंगळवार (दि.21) रोजी मुंबईला जाण्यासाठी रात्री आठच्या सुमारास कोल्हापुर रेल्वे स्थानकावर आले होते.त्यावेळी मुंबईला जाणारी रेल्वे सुटण्याची वेळ झाल्याने ती पकडण्यासाठी जात असताना खाली पडून जखमी झाले होते.त्यांना तात्काळ 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्यांचा मृत्यु झाला.रेल्वे प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकाना या घटनेची माहिती दिली.सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यांच्या पश्च्यात दोन भाऊ,दोन बहिणी ,पत्नी एक मुलगा आहे.