प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : प्रतिनिधी :
कोल्हापुर- जिद्द फौंडेशनच्या संस्थापिका सौ.गितांजली डोंबे यांना शाहू स्मारक भवन,कोल्हापूर येथे मराठी चित्रपट सुष्टीतील प्रसिद्ध अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रांतीज्योती कला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी इतर मान्यंवर उपस्थित होते.
जिद्द फौंडेशन,वेद फौंडेशन आणि स्वामी एंटरप्रायझेस यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्याच प्रमाणे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) कोल्हापूर नगरीत प्रथमच "आई महालक्ष्मी संमेलन " आयोजित केले होते.या संस्थेच्या माध्यमातून कला ,साहित्य,समाज ,शिक्षण, अध्यात्म ,संस्कृती,उद्योग,महिला प्रर्यावरण आणि युवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखंनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो.हा कार्यक्रम दि.29/12/2024 रोजी राजर्षि छ.शाहु स्मारक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त पुरस्कर्ते आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.