स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची आणि इंचलकरंजी पोलिसांची संयुक्त कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इंचलकरंजी येथील विशाल आप्पासो लोकरे याचा खून केल्या प्रकरणी आरोपी सागर मोहन वाघमारे (वय 29) ,संतोष बळवंत मुन्नोळी (वय 21)आणि यश अरुण चौगुले (वय 26.सर्व रा.संतमळा ,इंचलकरंजी) या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
अधिक माहिती अशी की,शुक्रवार (दि.17) रोजी रात्री दहाच्या सुमारास उत्तम चोकात विशाल यांचा खून झाला होता.याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी इंचलकरंजी पोलिस ठाण्यात दिली होती.या दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी या झालेल्या खूनाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आणि इंचलकरंजी पोलिसांना खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुशंगाने पोलिसांनी घटना स्थळी जाऊन माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत असताना इंचलकरंजी पोलिसांना या खूनातील आरोपी यश अरुण चौगुले हा पंचगंगा साखर कारखाना जवळ असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला संतमळा येथून ताब्यात घेतले.तर सागर वाघमारे आणि संतोष मुन्नोळी यांनी आपले फोन बंद करून ठेवले होते.त्यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला हे दोघे सावंतवाडी येथे रेल्वे स्टेशनवर थांबल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एकमेकांच्याकडे रागाने बघितल्याच्या कारणातुन विशाल लोकरे याला शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास उत्तम चौकात त्याला मारहाण करून तेथून जात असलेल्या ऊसाच्या ट्रॉली खाली ढ़कलून देऊन त्याच्या पोटावर ,डोक्यात आणि मांडीत गंभीररित्या मारहाण करून खून केल्याची कबुली दिली.या तिघांना अटक करून पुढ़ील तपासासाठी इंचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.याचा पुढ़ील तपास इंचलकरंजी पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,गडहिग्लज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निकेश खाटमोडे-पाटील,इंचलकरंजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर सहा.पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस सागर चौगुले,प्रदिप पाटील,विशाल चौगुले,समीर कांबळे,सुशील पाटील यांच्यासह इंचलकरंजी गावभाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलिस अनिल पाटील,अनित कदम,बाजीराव पाटील,अमर कदम आणि राम पाटील यांनी केली.