राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने, ऊसतोड मजुरांना दिली मायेची ऊब : थंडीत उबदार ब्लँकेट वाटप

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर :  राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने वाढत्या थंडीपासून ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन उबदार ब्लॅकेटसचे वाटप करण्यात आले. 

यावेळी समाजातील अन्य घटकांनीही, आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या भावनेतून अशा दुर्लक्षित असणाऱ्या घटकांना शासनाच्या विविधांगी योजनाचा लाभ मिळवून द्यावा, ऊस तोड कामगारांनी आपल्या लेकरांची आबाळ होणार नाही, याची काळजी घ्यावी. आज ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ऊबदार ब्लेंकटस देऊन केलेली मदत प्रेरणादायी आहे, असे मत संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. 

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्तं सहयोगाने कणेरीवाडी येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांना ब्लेंकेट्स वाटप करण्यात आलीत. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सुरेश केसरकर, मोहन सातपुते, संभाजी थोरात, भगवान माने, अनिता काळे, प्रतीक्षा जाधव,संजय सासने, सुभाष पाटील,विजय आरेकर, रघुनाथ मुधाळे, सर्जेराव हळदकर, लालासाहेब गायकवाड, सुरेश पवार,  साताप्पा सुतार, दिनकर आडसूळ, प्रविण भिके, प्रल्हाद कांबळे, आनंद सज्जन, निखिल सुतार, प्रदीप आवळे, हरी ओम गागडे, यांच्यासह कामगार, कर्मचारी आदि उपस्थित होते.

----------------

चौकट: 

 बिऱ्हाड पाठीवर घेऊन उसतोडणीसाठी आलेल्या

ऊस तोड मजुरांच्या लेकरांची आबाळ होते. शिक्षण अर्ध्यावर राहते. आरोग्याच्या समस्या भेडसावतात. किशोर वयीन मुलींच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ऊस तोडणी क्षेत्रात येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांना आरोग्य सेवा, सकस आहार, साखर शाळा शासनाने सुरू करावी.

--------------

*फोटो* : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त सहयोगाने कणेरीवाडी येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ब्लेंकेट्स वाटप करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post