कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री.सुनील फुलारी आणि कंळबा कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे यांना राष्ट्रपती पदक.


प्रेस मीडिया लाईव्ह '

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर  -कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. सुनील फुलारी  आणि कळंबा कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे  यांना सेवा काळात  उल्लेखनीय कामगिरीमुळे 76 व्या. प्रजास्ताक दिनानिमित्त  राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.  मा.सुनील बळीरामजी फुलारी यांचे शिक्षण एमएससी, एमबीए असून त्यांनी सायबर क्राईमचा डिप्लोमा केला आहे. त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव या ठिकाणी उत्कृष्ट  सेवा  बजावली आहे. १९९७  साली त्यांनी नागपूर क्राईम ब्रॅचला एसीपी म्हणुन सेवा  कामकाजाला सुरूवात केली होती. त्यांना आता पर्यत अनेक  पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात  केले आहे.    

      कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी म्हणून गेल्या दोन वर्षापासून सुनिल फुलारी हे काम पहात आहेत. त्यांना २०१३  साली पहिले राष्ट्रपती पदक मिळाले होते. त्यानंतर २०२५ साली दुसरे पदक मिळाले आहे. परिक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांचा  सन्मान केला आहे.

 आपल्या सेवा काळात  गडचिरोली, चंद्रपूर, नक्षलवादी या ठिकाणी उल्लेखनीय  कामगिरी केली. नागपूर सारख्या शहरात मोका व एमपीडीए कायद्याची कडक  अंमलबजावणी करून होत असलेल्या  गुन्हयाचे प्रमाण कमी  करण्यात यश आले .2020 च्या  कोरोना काळात कडक कायद्याची अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली. कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड येथील जातीय हिंसाचार ,मराठा आरक्षणविषयक आंदोलने या दरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती गंभीर असताना जातीय सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सातत्याने राबवून समाजामध्ये सलोखा निर्माण केला.  

 2024 च्या  लोकसभा आणि  विधानसभा निवडणूका भयमुक्त  केल्या. त्याची काटेकोरपणे निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी केली. कोल्हापूर परिक्षेत्राला कर्नाटक आंतरराज्य सीमा आहे.दोन्ही राज्यांतील पोलीस दलात समन्वय ठेवून अघटीत घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेतली. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. परिक्षेत्रातील नवीन पोलीस ठाणी, निवासी इमारती यांची उभारणी,पोलीसांसाठी कल्याणकारी योजना, मानसिक ताण तणाव हाताळणीचे उपाय, कौशल्यपूर्ण कामकाज प्रशिक्षण देणे यासाठी फुलारी यांनी काम केले आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन  सरकारने त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपदी पदकाने सन्मानीत केले आहे.

त्याच प्रमाणे    कळंबा कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक विवेक वसंत झेंडे हे २००२ पासून तुरुंगाधिकारी श्रेणी  दोन या पदावर नियुक्त झाले. त्यांनी आतापर्यंत कोल्हापूर, आर्थररोड, अमरावती, सातारा, तळोजा, नाशिक, सांगली या जिल्ह्यात कारागृह तुरुंगाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. सध्या अतिरिक्त अधीक्षक म्हणून कळंबा कारागृहात सेवा बजावत आहेत.

  कारागृहात उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल त्यांना अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सन्मानचिन्ह २०२३ मध्ये मिळाले आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post