विशेष वृत्त :एक कोटीचे बक्षीस टाऊन हॉल एसटी बस स्थानकाला द्या.

 टाऊन हॉल बसस्थानकावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- एक वर्षभर परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकावर स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येणार आहे.त्यासाठी  या अभियांनातर्गत अ,ब,आणि क.वर्ग वारी करुन तीन कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असून "अ "वर्गात येणाऱ्या बसस्थानकाला एक कोटी रुपये मिळणार आहेत.तेव्हा हे बक्षीस टाऊन हॉल एसटी बस स्थानकाला मिळावे अशी टाऊन हॉल एसटी बस स्थानकावरून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी केले आहे.कारण हे एसटी बस स्थानक कोल्हापुर जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबरचे बसस्थानक आहे.तेथे प्रवाशांना बसण्यासाठी उघड्यावर प्रशस्त जागा ,थंडी मध्ये वयस्कर प्रवाशांना कुडकुडत बसण्यासाठी सोय,उन्हाळ्यात सगळीकडुन येणारी हवा आणि भर पावसात एसटी बसची वाट बघत अंगावर झेलत पावसाच्या सरी याचा आनंद घेत असलेले भिजून चिंब झालेले प्रवाशी आणि महिलांच्या साठी शौचालयाची सोय .या सर्वाची दखल घेऊन परिवहन महामंडळाने या एसटी बस स्थानकाला एक कोटीचे बक्षीस दिल्यास त्याचे नुतनीकरण करण्यात येईल.

हे सांगण्याचा उद्देश म्हणजे या एसटी बस स्थानकाची दुरावस्था.वारंवार एसटी विभागाकडे काहीनी तक्रार करून ही त्यांची संबंधित विभागाला निवारा शेड बांधायला वेळ नाही.हा एसटी बस स्टॉप कोकणला जोडलेला एसटी बस स्थानक असून ग्रामीण भागातील आणि आस पासच्या गावातील नागरिक नोकरी साठी तर मुले मुली शिक्षणासाठी येत असतात.तर शहरातील काही जण नोकरी निमित्त मलकापूर ,पन्हाळा,कोतोली आणि रत्नागिरी भागात एसटी बसने प्रवास करत ये जा करीत असतात.बाहेर गावाहून पर्यटक कोल्हापूरात महालक्ष्मी ,जोतिबा दर्शनासाठी येत असतात.त्यांना टाऊन हॉल एसटी बस स्थानकावर आल्या शिवाय पर्याय नाही.पण या एसटी बस स्थानकाची दुरावस्था पाहिल्यावर समाधान व्यक्त केले जात असते.गेल्या दोन तीन वर्षांपासून एसटी बस स्थानक पाडले असून त्याचे दुरुस्त करण्याचे हा विभाग करीत नाही .काही प्रवाशांनी,सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित विभागाकडे तक्रार करुन ही या कडे दुर्लक्ष करत आहेत.निदान पावसाळ्यात तरी तात्पुरते निवारा शेड उभा केले पाहिजे होते.या प्रवाशांनी एसटी बस ची वाट बघत कुठे थांबायचे.रस्त्यात थांबले तर भर धाव येत असलेल्या वाहनाने उडविले तर याला जबाबदार कोण.काहीनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकारी म्हणतात हे आमचे काम नाही.दुरुस्त करण्यास निधी उपलब्ध नाही.मग कोट्यावधी रुपये बक्षीस रुपात देण्यास निधी आहे.पण नवीन एसटी बस स्थानक बांधण्यास निधी नाही.हे आश्चर्यचकित होण्या सारखे आहे.प्रवाशांचे एकच मत आहे आधी प्रवाशांची थांबण्याची सोय करून बक्षीस वाटत फिरा.त्याच प्रमाणे काही एसटी बस बंद अवस्थेत असलेल्या त्या रस्त्यावर धावत आहेत.मध्येच बंद पडल्यातर ,ब्रेकडाऊन झाल्यातर दुसरया एसटी बस ची वाट बघत तिस्टत बसावे लागते.त्यात जागा असेल एसटी थांबते.काही वेळा तर वादाचे प्रसंग निर्माण होतात.काही महिन्यापूर्वी प्रवाशांना बंद पडलेल्या एसटीतील प्रवाशांना दुसरयां एसटीत घेण्यासाठी दोन वाहकात चांगलीच जुंपली आणि हे प्रकरण मारामारी पर्यत गेले होते.असे प्रकार घडायचे नसतील तर कोट्यावधी रुपये बक्षीस रुपात वाटण्या पेक्षा नवीन एसटी बस खरेदी करा.असे प्रवाशी वर्गाचे मत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post