जप्त केलेल्या सायलेंन्सरवर रोड रोलर फिरविला. वाहतूक शाखेची दणक्यात कारवाई.

 

         


  प्रेस मीडिया लाईव्ह  :

मुरलीधर कांबळे  :

    कोल्हापूर - आज वाहतुक शाखेच्या वतीने जप्त केलेल्या दुचाकी वाहनांचा मूळ सायलेन्सर बदलून डुप्लिकेट सायलेन्सरचा वापर केलेल्या वाहनधारकांचे सायलेन्सर शुक्रवारी सकाळी शहर वाहतूक शाखेने दसरा चौक ते शहाजी कॉलेज परिसरात सायलेंन्सरवर  रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले.ही कारवाई शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर आणि इचलकरंजीमधील जप्त केलेल्या ७३७ कर्णकर्कश सायलेन्सरवर ही कारवाई करण्यात आली.

शहरात काही हुल्लडबाज  दुचाकीधारकांकडून, वाहनांच्या मूळ कंपनीचे सायलेन्सर बदलून त्याऐवजी कर्णकर्कश आवाजाचे डुप्लिकेट सायलेन्सर बसविण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहर वाहतूक शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध व्यापक मोहीम राबविली होती. त्यात वाहनावर लोगो वापरणाऱ्या १२३५ दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करून १२ लाख ३३ हजार रुपयांचा दंड आकारला. इचलकरंजी वाहतूक शाखेने ३६ दुचाकी वाहनधारकांवर कारवाई केली. तसेच डुप्लिकेट सायलेन्सरचा पुनर्वापर होऊ नये, यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखेकडून ताब्यात घेतलेले ७०१ सायलेन्सर आणि इचलकरंजी वाहतूक शाखेचे ३६ असे एकूण ७३७ सायलेन्सर रोड रोलर फिरवून नष्ट केले. या वेळी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके  उपस्थित होते.

वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post