सीडीएम "बँकेच्या मशीन मध्ये बनावट नोटा भरुन चलनात आणण्यारया टोळीतील चौथ्या आरोपीचे नाव निष्पन्न. पोलिसांकडुन आरोपीचा शोध चालू.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - "सीडीएम" बँकेच्या मशीन मध्ये पाचशे रुपयांच्या नोटा भरुन चलनात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या त्रिकुटाला जुना राजवाडा पोलिसांनी बुधवार (दि.22) रोजी त्यांच्या कडुन पाचशे रुपयांच्या 86 नोटा जप्त करून अटक केली होती.त्यांच्याकडे चौकशी करत असताना बनावट नोटा पुरवठा करणारा चौथा संशयीत आरोपीचे नाव निष्पन्न झाले.अभिजीत राजेंद्र पवार (रा.गडमुडशिंगी मुळगाव निपाणी) असे त्याचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जुना राजवाडा पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी निखील किशन सरगर (वय 30.मुळगाव करगणी,जि.सांगली,सध्या राजारामपुरी) अमोल गणपती पोतदार (वय 47.मंगळवार पेठ,कोल्हापूर )आणि शिवप्रसाद दिलीप कदम (वय 25.रा.मुळगाव वा.कापशी ,सध्या .न्यु शाहुपुरी) यांना अटक केली होती.

यातील सराफ व्यावसायिक अमोल पोतदार यांने आपल्या  बँक खात्यात पैसे भरण्यासाठी आपल्या मुलाकडे पाचशेच्या नोटा भरणा करण्यासाठी दिल्या होत्या.त्या "सीडीएम "मशीन मध्ये भरत असताना मशीन मधुन पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाहेर आल्याने त्या नोटा बनावट असल्याचे तेथील कर्मचारी यांच्या निदर्शनास आल्याने ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांच्या कानावर घातली.त्यांच्या सांगण्यावरून त्या कर्मचारयाने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्यांनी दिलेल्या फिर्यादीने या त्रिकुटाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली .त्यांच्याकडे चौकशी केली असता सरगर यांने अमोल पोतदार या बनावट नोटा दिल्याचे सांगितले.सरगर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने शिवप्रसाद कदम यांच्याकडून घेतल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवप्रसाद कदम यांच्याकडे चौकशी केली असता त्याने अभिजीत पवार यांच्या कडुन घेतल्या असून त्याची राजारामपुरी येथे त्याची शॉपी होती.त्यातुन त्याची ओळख झाल्याने अभिजीत राजेंद्र  पवार यांने या बनावट नोटा दिल्याचे सांगितले.अभिजीत  पवार हा पसार झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post