विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या कडुन शहरातील पोलीस ठाण्यांची तपासणी .

 दाखल गुन्हे, स्वच्छता, निटनेटकेपणा पाहून मारले मार्क  . कर्मचारी, अधिकाऱ्यांची  दिवसभर धावपळ.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी करवीर व शहर उपविभागीय कार्यालय, जुना राजवाडा, शहर वाहतूक नियंत्रण विभागाची तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. यावेळी पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड, दाखल व उकल गुन्ह्यांची संख्या अधिकाऱ्याकडे दिलेल्या तपासाचे बारकावे, पेंडिग तक्रारी याबाबत तपासणी केली.

गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या पोलीस ठाण्यांची आयजींकडून तपासणी केली जाणार आहे. त्या   पोलीस ठाण्यातील पेंडीग गुन्हे निकाली काढणे, फायली वरील धूळ  स्वच्छ करून  निटनेटकेपणा आणुन तसेच हत्यारे व्यवस्थित ठेवणे, रंगरंगोटी, पोलीस ठाण्यातील फलक दुरुस्त करणे या गडबडीत  होते. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील  कचरा, तसेच झांडांची मुळे, आडव्या आलेल्या फांद्या काढण्यात आल्या  होत्या. सर्व यंत्रणा सज्ज झाल्यानंतर तपासणीची प्रतिक्षा करत होते.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी हे शहर व करवीर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात दाखल झाले. त्यांनी करवीर विभागाची तपासणी केली. रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व विभागातील फायलींची त्यांनी तपासणी केली. त्यानंतर रात्री ते जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पोहोचले. अडीच ते तीन तास तळ ठोकून होते. जाताना त्यांनी शहर वाहतूक नियंत्रण विभागाची तपासणी केली.

यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात रांगोेळी काढून आकर्षक  कारपेट टाकले होते. झाडाच्या कुंड्या दोन्ही बाजुला लावल्या होत्या. पोलीस ठाण्यातील वातावरण प्रसन्न वाटत होते. सर्व कर्मचारी व अधिकारी गणवेशात होते.

जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील ही तयारी पाहून मिसींग अथवा काही तक्रार अर्ज देण्यासाठी आलेले तक्रारदार काहीतरी कार्यक्रम असावा या गैरसमजातून उद्या येऊ असे म्हणत निघून गेले. दिवसभरात किरकोळ वादविवाद  वगळता फारशा तक्रारी दाखल झाल्या     नाहीत. यावरून तक्रारदारांनी पाठ फिरवल्याचे दिसत होते.


Post a Comment

Previous Post Next Post