प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी रांतबीचा धनगरवाडा येथे शुक्रवार (दि.17) रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात बाबूराव सोनबा घुरके (वय 35) हे जखमी झाले असून त्यांना रात्री उशिरा उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
म्हासुर्ली पैकी रांतबीचा धनगरवाडा येथील बाबूराव घुरके हे पहाटे साडे पाचच्या सुमारास एकाच्या शेतात ऊस तोड करण्यासाठी रस्त्यावरुन एकटेच जात असताना त्यांच्यावर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी धामोड येथे रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती वन विभागाला समजताच वन विभागाचे अधिकारी रुग्णालयात येऊन जखमीची विचारपूस करत पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या .मात्र त्या वेळी गाडी उपलब्ध नसल्याने वन विभागाने कोल्हापुरातुन गाडी मागून रात्री उशिरा जखमीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.