प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ललित कला भवन, राजारामपुरी कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसकर यांच्या हस्ते ध्वजावंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या जवाहर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने, मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
सदर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्ती पर गीतांचे गायन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करून, सर्वांनीच जागृत नागरिक या नात्याने सजग असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, संभाजी थोरात, वसंत पाटील, विदुल परांजपे, बाळासाहेब कांबळे, संतराम जाधव, अनिता काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी मान्यवरांना रोप व आरोग्य विषयक पुस्तके दिली.
यावेळी भगवान माने, रघुनाथ मुधाळे, विजय आरेकर, बाळासाहेब कांबळे, संतराम जाधव, संजय सासणे, संभाजी थोरात, मुनीर मुल्ला, अनिता काळे, प्रमिला शर्मा, मोनिका मिठारी, मनोरमा सरदेसाई, माधुरी चौगुले, विदुला परांजपे, शुभांगी कुलकर्णी, सरदार सुतार, डी. आर. पवार, सुनील कुंभार, संजय सुतार, धीरज मोरे, तानाजी मोरे, आसावरी चव्हाण, प्रमोद कोळी, केतन सावंत, ऋषिकेश जोशी, किशोर राधानगरीकर, सुरेश हडपद, अविनाश कलकुटगी, विठ्ठल करमळकर, वनिता सूर्यवंशी, राजश्री लाखे, सुषमा सोलापुरे, वेदिका चव्हाण तसेचनेहरू विद्यालयाच्या शिक्षिका सारिका पाटील, शोभा शिंदे, मनीषा खोचगे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती वायचळ यांनी केले तर, आभार सुजाता कलकुटगी यांनी मानले.