प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- "मोका "अंतर्गत कारवाई झालेल्याची कंळबा जेल पासून नागाळापार्का पर्यत घोषणा देत मोटारीतुन मिरवणूक काढ़त दहशत निर्माण करण्यारया टोळीचा प्रमुख अनिकेत अमर सुर्यवंशी (वय 23.रा.नागाळा पार्क) याच्यासह सात जणांना शाहुपुरी पोलिसांनी अटक केली आहे.यातील चार संशयीत पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.शाहुपुरी तीन वाहनासह मोटार जप्त केली आहे.
अटक केलेल्या सुर्यवंशीसह आदित्य उर्फ गब्बर अमर सुर्यवंशी (वय 25.रा.नागाळा पार्क),अनुराग दिलीप राखपसारे (वय 20.रा.सदरबाजार )करण उर्फ तुषार कुमठे (वय22,शाहू कॉलेज समोर) सागर गौडदाब (वय 34.कदमवाडी) ,प्रथमेश समुद्रे (वय 20.सदरबाजार) ,वेदांग पोवार (वय 30.रा.बिंदु चौक) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.यातील चार जण पसार झाले असून त्यांना लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिस निरीक्षक डोके यांनी सांगितले.
यातील टोळीच्या प्रमुखाची 24 डिसेबर रोजी कंळबा जेल मधुन सुटका झाली होती.त्या निमित्ताने त्याच्या साथीदारांनी मोटारीतुन घोषणा देत त्याच्या घरा पर्यत मिरवणूक काढली होती.याची माहिती शाहुपुरी पोलिसांना समजताच त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.