प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील आळते येथे अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने सुरज दस्तगीर सुतार (वय 48.रा.जवाहरनगर ,इंचलकरंजी) जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना (दि.04 ) रोजी मृत्यु झाला.हा अपघात (दि.27 डिसेबर ) रोजी घडला होता .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत सुरज सुतार आणि त्याचा मित्र सुनिल जाधव हे शनिवारी (दि.27) रोजी दुपारच्या सुमारास जेवायला आळते गावाच्या दिशेने मोटारसायकल वरुन जात होते.त्या वेळी त्यांच्या मोटारसायकलला आळते रोडवर एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले.यात सुरज हा गंभीर जखमी झाला होता.सुरज हा सुतार काम करीत असून त्यांच्या पश्च्यात आई-वडील ,पत्नी ,एक विवाहित मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे.तर जखमी सुनिल जाधव इंचलकरंजी परिसरात पान टपरी आणि हॉटेल असल्याचे समजते.