फिरण्यास गेलेल्या बंगाली कारागीरांना मारहाण..

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कासार गल्ली येथे रहात असलेले बंगाली कारागीर जेवण करून फिरण्यास गेलेल्या दोघा बंगाली कारागीरांना मारहाणीचा प्रकार बुधवारी रात्री घडला. दुधाळी परिसरात चार ते पाच संशयितांच्या मारहाणीत दिनेश सुदर्शन मायली (वय ४२) व पापाय सिंग रॉय (२०, रा. कासार गल्ली, मूळ रा. पश्चिम बंगाल) जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

................

शाहुवाडी तालुक्यात गव्याने धडक दिल्याने दोन वेगवेगळ्या घटनेत तिघे जखमी.

कोल्हापूर - शाहुवाडी तालुक्यातील माण परळी येथे खुदाईचे काम आटोपून परतणाऱ्या मजूराच्या दुचाकीला गव्याने जोराची धडक दिली. यामध्ये संतोष राठोड (वय ४०) व त्याची पत्नी संगिता राठोड (३५, मूळ रा. विजापूर) जखमी झाले. राठोड दांम्पत्य सध्या बांबवडे येथे राहण्यास असून कामानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील माण परळी येथे गेले होते. बुधवारी सायंकाळी दोघे घरी परत येत असताना ही घटना घडली.  संतोष यांच्या छातीला, पायाला गंभीर दुखापत झाली.  जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

तर दुसरया घटनेत महेश युवराज विचारे (वय 33.रा.नांदारी ,ता.शाहुवाडी) हे गुरुवारी (दि.02) रोजी रात्री एकच्या सुमारास कामावरुन घरी जात असताना गांवदारी या ठिकाणी त्यांच्या गाडीला गव्याने धडक दिल्याने ते जखमी झाले.त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .

................

मोटारसायकल घसरल्याने एक जखमी.

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील  काखे फाटा  येथे मोटारसायकलच्या  आडवे कुत्रे आल्याने तोल जाऊन पडल्याने  मोटारसायकलस्वार जखमी झाला. क्रांतीकुमार बंडोपंत मोरे (वय ५२, रा. आरळे, पन्हाळा) असे जखमीचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला होता. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. 

....................................

मोटारसायकलच्या धडकेत एक जखमी.

कोल्हापुर- उचगाव येथील मणेरमळा परिसरात रहात असलेले विशाल विलास पाटील (वय 31) हे गुरुवार (दि.02) रोजी सकाळी मणेरमळा येथील पाटील कॉलनी येथून आपल्या घरी चालत जात असताना पाठिमागून येत असलेल्या अनोळखी वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले.त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .विशाल हे इंडो -काऊंट येथे नोकरीस असून ते त्या परिसरात रहात असलेल्या  आपल्या आईला भेटण्यासाठी गेले होते.

Post a Comment

Previous Post Next Post