केएमटीवर दगडफेक केल्या प्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शहरातील व्हिनस कॉर्नर येथे केएमटी बसवर दगडफेक केल्या प्रकरणी आरोपी अभिषेक मंगेश घोडके (वय 26.रा.राजारामपुरी,को.) आसिफ आमनुल्ला नायकवडी(वय 30.रा.इंगळी,ता.हातकंणगले ) आणि ओंकार जगन्नाथ चौगुले (वय22.रा.पाथरवट गल्ली,सायबर चौक ) या तिघा आरोपीसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.   हा प्रकार मंगळवार(दि.14) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला होता.शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

काही ही कारण नसताना मद्यपी कडुन केएमटी बसवर दगडफेक करून नुकसान केल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.   या अनुशंगाने माहिती घेऊन तपास करीत असताना हा गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील अभिषेक घोडके यांने आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली असून हे सर्व जण सायबर चौकात असल्याची माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीनुसार त्या परिसरात जाऊन एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली दिल्याने त्यांना शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post