प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - मा.पोलिस महानिरीक्षक मा.सुनिल फुल्लारीसो यांनी शुक्रवार (दि.24) रोजी वार्षिक निरीक्षणच्या निमित्ताने पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली.यावेळी त्यांना सन्माननीय गार्ड आणि पोलिस बँडच्या पथकाने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करुन मानवंदना देण्यात आली. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे, त्याच्या सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सुचना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिल्या शुक्रवारी त्यांनी वार्षिक निरीक्षण दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी गुन्हे आढावा बैठकीच्या सुरुवातीला उत्कृष्ट कामगिरी करणारया पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच सहा. सरकारी अभियोक्ता, तसेच २०२४ मधील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये तुकाराम माळी तालीम, मंगळवार पेठ, कोल्हापूर, कलानगरचा महागणपती, कलानगर इचलकरंजी, जय शिवराय व्यायाम तालीम मंडळ, सावर्डे दुमाला, ता. करवीर यांचा समावेश आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस पाटील तृप्ती प्रदिप जगताप, केर्ली, ता. करवीर, रविंद्र बापूसो जाधव पोलीस पाटील, हणमंतवाडी, ता. करवीर यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
यावेळी २०२२ मधील कार्यमुल्याकनाच्या आधारे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून पाच पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली होती. त्यात राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे शिवाजीनगर पोलीस ठाणे व पाचवा क्रमांक मिळविणारे शिरोळ पोलीस ठाण्यास प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक मा.महेंद्र पंडित यांनी महिला विषयी गुन्हे, शरिराविरुध्दचे गुन्हे, अवैध व्यवसायावर केलेली कारवाई याची माहिती दिली. कोल्हापूर पोलीसांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई, डायल ११२, तसेच वर्षभरात केलेल्या कारवाईची माहिती दिली. या वार्षिक निरीक्षणास अप्पर पोलीस अधिक्षक दोन,पोलीस उपअधीक्षक सात यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.