प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : प्रतिनिधी
विधानसभेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे. कोल्हापूर - कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला.या वेळी विधानसभेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोर्हे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी बोलताना कोल्हापुरातील पत्रकारांचा घरकूल व पेन्शनचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्ष शीतल धनवडे प्रमुख उपस्थित होते.या वेळी
गोऱ्हे पुढ़े म्हणाल्या, कोल्हापुरातील पत्रकारांच्या घराचा प्रश्न सध्या कोणत्या स्थितीत आहे याची माहिती घेऊन त्यांना पुढील कार्यवाहीसाठी मदत केली जाईल. घरकुलबाबत महसूल, नगरविकास यांच्या परवानग्या मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. ज्येष्ठ पत्रकारांना अद्यापही पेन्शन मिळत नसल्याचा मुद्दा काही पत्रकारांनी गोऱ्हे यांच्यापुढे मांडला. यावर त्यांनी पेन्शनबाबत एक सुटसुटीत नियमावली तयार केली जाईल. यासाठी कोल्हापुरातील पत्रकारांनीही सूचना कराव्यात. त्यानुसार पुढील पंधरवड्यात मुंबईत विशेष बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूर प्रेस क्लबच्या इमारतीसाठीही मदत करण्याचे आश्वासन गोऱ्हे यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी २१ हजार रुपये व पाच संगणक प्रेस क्लबला भेट देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, सुखदेव गिरी, गुरुबाळ माळी, समीर मुजावर, दिलीप भिसे, जेष्ठ फोटोग्राफर संजय देसाई,राजा उपळेकर,अनिल वेल्हाळ, मालोजी केरकर,ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव यादव, संग्राम काटकर, हिलाल कुरेशी,शशी मोरे, रवी कुलकर्णी, दीपक घाटगे, सचिन भोसले, दीपक जाधव, जितेंद्र शिंदे ,मुरलीधर कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, कर्मवीर इंग्लिश मिडीयमच्या शालेय विद्यार्थ्यांनी भेट देऊन, पत्रकारितेसंदर्भात प्राथमिक माहिती घेऊन शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर,अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, सिटीझन फोरमचे प्रसाद पाटील,रुपा शहा यांनीही कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर कार्यालयात येऊन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
कोल्हापुरचे पत्रकार सजग असून कोल्हापूर हे प्रचंड वेगवान घडामोडीचे शहर आहे. येथील पंचगंगा प्रदूषण, जयंती नाला, टोलचे आंदोलन यावर पत्रकारांनी वारंवार आवाज उठवला असून येथील पत्रकार सजग आहेत या शब्दांत गोऱ्हे यांनी कौतुक केले.