कोल्हापूरचे नाव स्केटिंग खेळामध्ये जागतीक पातळीवर पोहोचवा. सुरेश केसरकर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : स्केटिंग हा भारतीय खेळामधील एक महत्त्वाचा खेळ असून स्केटिंग खेळामध्ये कोल्हापूरचा ठसा जागतीक पातळीवर उमटविण्यासाठी प्रयत्न करावेत व कोल्हापूरला नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन सुरेश केसरकर यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना केले.

एस. के. रोलिंग अकॅडमीच्यावतीने स्केटिंग या खेळामध्ये अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल या अकॅडमीचे अध्यक्ष भूपाल शेटे व सचिव सुहास कारेकर यांचा त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रामध्ये लहानपणापासूनच भरीव योगदान देणाऱ्या व दहाहून अधिक लघुपटात मुख्य भूमिका साकारून कलेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला कोल्हापूरचा बाल कलाकार आदित्य म्हमाने यांचा कला शिक्षिक सागर बागडे, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्या हस्ते, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. 

तत्पूर्वी निर्मिती फिल्म क्लब निर्मित स्केटिंग : मृत्यूला भिडणारी गोष्ट या संवेदनशील लघुपटाचा प्रिमीअर शो संपन्न झाला. सिने अभिनेते संजय मोहिते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्लॅप मारुन लघुपटाचे उद्घाटन करण्यात आले. 

स्केटिंग - मृत्यूला भिडणाऱ्या संवेदनशील मुलाची गोष्ट असून, या लघुपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक अनिल म्हमाने, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, सहनिर्माता विश्वासराव तरटे, सिकंदर तामगावे, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक अर्हंत मिणचेकर, अंतिमा कोल्हापूरकर यांचे तर डी.ओ.पी. म्हणून अमर पारखे यांनी काम पाहिले आहे.

यावेळी अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, सागर बगाडे, भूपाल शेटे, ॲड. करुणा विमल, सुहास कारेकर, नीती उराडे, अंतिमा कोल्हापूरकर यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले. तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर तसेच आभार अर्हंत मिणचेकर यांनी मानले.

--------------------------------

फोटो -

एस. के. रोलिंग अकॅडमीचे अध्यक्ष भूपाल शेटे व सचिव सुहास कारेकर, बालकलाकार आदित्य म्हमाने यांचा जाहीर नागरी सत्कार करतांना डावीकडून सिकंदर तामगावे, अंतिमा कोल्हापूरकर, सतेज औंधकर, सागर बगाडे, ॲड. करुणा विमल, अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, वंदना धनवडे आणि मान्यवर.

Post a Comment

Previous Post Next Post