रंकाळा तलावात उडी मारून वृध्दाची आत्महत्या.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- लक्षतिर्थ वसाहत  येथील मुरलीधर मारुती पांगे (वय 87.रा.रेडेकर गल्ली,लक्षतिर्थ वसाहत) यांनी आजाराला कंटाळुन रंकाळा तलावात उडी मारून आत्महत्या केली.हा प्रकार गुरुवार (दि.09) रोजी दुपारच्या सुमारास घडला असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत हे आजारी असून ते दुपार पर्यत घरी होते.त्यांच्या घरातील नातेवाईक कामासाठी बाहेर गेले होते.घरी परत आल्यानंतर ते दिसले नाहीत.नातेवाईकांनी त्यांचा शोध   घेत असताना कुणीतरी रंकाळा तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. सदरचा मृतदेह  कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचारयानी पाण्या बाहेर काढ़ला असता नातेवाईकांनी मृतदेह ओळखून ते दुपार पासून घराततुन बेपत्ता झाले होते.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात येऊन उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post