कोणे टोळी " वर हद्दपारीची कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- इंचलकरंजी आणि कुंरुदवाड येथील कोणे टोळीच्या शुभम संजय कोणे (रा.चंदुर रोड बरगे मळा ,इंचलकरंजी) अर्जुन महेश निवाते (रा.दाते मळा,इंचलकरंजी) ,चैतन्य उर्फ गणेश जटाप्पा माळी(रा.जुना चंदूर रोड बरगे मळा,इंचलकरंजी)आणि विशाल नरसिंग जाधव (लिंबू चौक संत मळा,इंचलकरंजी) यांना कोल्हापुर जिल्ह्यातुन सहा महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारीना गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या टोळ्यावर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते.

इंचलकरंजी आणि कुरुंदवाड परिसरात "कोणे टोळी"च्या गुन्हेगारी पार्श्वभूमी च्या वाढ़त्या कारवाया त्याला आळा घालण्यासाठी त्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक यांनी प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणुन गडहिग्लज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांची नेमणूक केली होती.सदर प्रस्तावाची चौकशी अधिकारी म्हणुन चौकशी करून त्याचा अहवाल पोलिस अधीक्षक यांच्या कडे सादर केला.या अहवालानुसार पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी "कोणे टोळी "वर कोल्हापूर जिल्ह्यातुन सहा महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई केली.त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक यांना सूचना दिल्या.

कोणे टोळीतील हद्दपार झालेले चौघे जण कोल्हापूर जिल्हयात आढ़ळल्यास त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणारयाचे नाव गुप्त ठेवले जाईल.असे आवाहन पोलिस अधीक्षक यांनी नागरिकांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post