प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -एका वधू -वर सूचक संस्थेकडे आपली माहिती देऊन काही तरुणीसह महिलांची आर्थिक फसवणूकसह त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवून फसवणूक केलेला पुण्याचा भामटा फिरोज निजाम शेख याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
विवाह जुळवणाऱ्या सोशल मिडीयावरील वेबसाईटवरून माहिती घेऊन फिरोज शेख महिलांशी संपर्क साधून आपल्या अमृत वाणीने तरुणीसह महिलांना बोलण्यातून तो भुरळ घालून त्यांच्या कडुन पैसे दागिने उकळल्यानंतर मला ब्रेन ट्युमर झाला आहे. आयुष्य खूप कमी आहे. माझ्याशी लग्न करून तुला पश्चाताप करावा लागेल असे सांगून इमोशनल ब्लॅकमेल करून तो महिलांशी संपर्क तोडत होता. अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. जुना राजवाडा पोलीसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापुरातील एका महिलेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीच्या पोलिसांनी फिरोज निजाम शेख (वय २८, रा. मुळ गांव गंगावळण, कळाशी, ता. इंदापूर, जि. पुणे सध्या रा.६०२, बी विंग, आयडीयल होम अपार्टमेंट, उस्मानिया मश्जिद जवळ, मिठानगर, कोंढवा, पुणे) यास सोमवारी अटक करून त्याला जुना राजवाडा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
या गुन्हयांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव या करीत आहेत. पोलीसांनी संशयीत फिरोज शेख याच्याकडे तपास सुरू केला आहे. मंगळवारी फिर्यादी महिलेस बोलवून पोलीसांनी माहिती घेतली. यावेळी फिर्यादी महिलेने फिरोज याचा केलेला प्रताप पाहून पोलीस ठाण्यात आकांड तांडव केला. माझी फसवणूक का केलीस असा जाब या महिलेने संशयीत फिरोजकडे पाहून विचारला.
दोन मुलांचा बाप आणि विवाहित असणारा फिरोज शेख हा गेल्या दहा वर्षापासून विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवरून माहिती घेऊन महिलांची फसवणूक करीत होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महिलांची फसवणूक त्याने केल्याचे समजते,मात्र दुसऱ्या महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील पंचवीस पेक्षा जास्त महिलांची त्याने फसवणूक केल्याचे समजते. जुना राजवाडा पोलीस याचा कसून तपास करीत आहेत. ज्या हॉटेलवर त्याने महिलांना नेले होते. तेथे त्याला फिरवले जाऊन अधिक माहिती घेणार आहेत.