31 डिसेंबरच्या पाश्वभुमीवर हुल्लडबाजी आणि दारु पिऊन चालकांच्यावर पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- सरत्या वर्षाचा जल्लोष आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांच्या कडुन होणारी हुल्लडबाजी आणि दारु पिऊन बेदारकपणे वाहन चालवून अपघाताच्या घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांना होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने कोल्हापूर जिल्हयासह शहरात पोलिस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता.यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून मद्यपींची तपासणी करण्यासाठी ब्रेन अनालायझर ठेवून पोलिसांची मद्यपींवर करडी नजर ठेवून हुल्लडबाजी करण्यारया आणि दारु पिऊन वाहन चालविणारयांच्यावर पोलिसांनी 1328 जणांच्यावर केसीस दाखल केल्या आहेत.यात प्रामुख्यांने दारु पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी 316 ,ट्रिपल सिट 237 ,विना नंबर प्लेट 032 ,सिट बेल्ट नसलेले 02 ,वनवेत वाहन चालविल्या प्रकरणी 021 ,वाहन चालवित मोबाईलवर बोलणे 013 ,सिंग्नल तोडल्या प्रकरणी 04 ,ज्यादा प्रवाशांची वाहतूक 09 , लायसन्स नसणे 031 ,उघड्यावर दारु पीत बसल्या प्रकरणी 05 व इतर 538 आणि बीपी कायदा 20.याचा समावेश आहे.

पोलिस प्रशासनाच्या वतीने 31डिसेंबरच्या निमित्ताने 06 पोलिस उपअधीक्षक,80 पोलिस अधिकारी आणि 700 पोलिस कर्मचारी असा पोलिस बंदोबस्त ठेवून त्यांनी वरील दंडात्मक कारवाई केली.

पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहन चालकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले की,मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारयां वाहन चालकांच्यावर पुढ़ील काळात सुध्दा कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.त्याच प्रमाणे दारु पिऊन वाहन चालवित असलेल्या वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना माहिती देऊन संबंधित वाहन चालकांचे लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले.तरी वाहन चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करून होणारी कायदेशीर कारवाई टाळावी.

Post a Comment

Previous Post Next Post