शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टला तमिळनाडू युनिव्हर्सिटी यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले.



प्रेस मीडिया लाईव्ह :

  कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टला निती आयोग मान्यता प्राप्त एशियन वेदिक कल्चरल रिसर्च तमिळनाडू युनिव्हर्सिटी यांच्या कडुन आदर्श समाजभूषण गौरव पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आले. 

  शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणे, गरजु विध्यार्थांना संगणक प्रशिक्षण मोफत देणे, गरजु विध्यार्थांचे शालेय फी भरणे, व्रुक्षारोपण करणे, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करुन मुलीला मंगळसूत्र, जोडवी,शालु, मुलाला ड्रेस,उपरणी देऊन मुलाकडील 50 लोक मुलीकडुन 50 लोक मुलाकडुन बोलावुन सर्वांची जेवणाची व्यवस्था करुन मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात करुन देण्यात येते. आश्रमांना भेट देऊन शालेय साहित्य, बेडसिट्स, मुलांना कपडे, व्रुध्द आजी आजोबा यांना कपडे वाटप करण्यात येते, तसेच मराठी साहित्य संमेलन पुर्णत शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येते. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. तसेच अनेक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा उधोजक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कारासाठी नागपूर, नाशिक,जालणा, जळगाव, परभणी,पुणे, मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, पंढरपूर, कोलकता, गोवा, अशा अनेक भागातुन राज्यातुन पुरस्कारकर्त्यांना बोलावुन त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, पेन देऊन सन्मानित करण्यात येते. कोरोना काळात गरजु लोकांना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले, पुरग्रस्त काळामध्ये बेडकिहाळ शाळेमध्ये येऊन राहिलेल्या महिलांना साडी, अन्नधान्य किट तसेच जनावरांना चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.‌ असे अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात. हे सर्व उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व उपक्रम राबविण्यात येते. या सर्व कार्याची दखल घेऊन एशियन वेदिक कल्चरल रिसर्च तमिळनाडू युनिव्हर्सिटी कडुन मा. डॉ बाबु व्ही व्हेजेन एशियन वेदिक कल्चरल रिसर्च तमिळनाडू युनिव्हर्सिटी फाऊंडर, हेड कोच, डॉ मनोकरण तमिळनाडु एक्स एम.एल.ए, डॉ हरिदोश असिस्टंट जज, डॉ एस.ग्याणशेखर पोलिस इन्स्पेक्टर तमिळनाडू, अशा अनेक थोर मान्यवरांच्या उपस्थितीत 

शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन शाल श्रीफळ सन्मानपत्र सन्मानचिन्ह मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. हा कार्यक्रम दि 25 रोजी तमिळनाडू होसुर क्लारिस्टा हॉटेल हॉल मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post