प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये व व्यवहार ज्ञान वाढावे, त्याची माहिती मिळावी याचबरोबर गणिताच्या मूलभूत संकल्पना वाढीस लागाव्यात या उदात्त हेतुने येथील डीकेटीईच्या अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग‘जी माध्यमातील इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार भरविण्यात आला. या उपक‘मात भाजी विक‘ेते म्हणून जवळपास ३०० विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. तर भाजी खरेदीसाठी सुमारे ५०० ते ६०० पालक उपस्थित होते. भाजी माझी विकताना विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीयच होता. शिवाय भाजी खरेदी करून पालक त्यांना प्रोत्साहन देत होते.
येथील सौ. इंदुमती क‘ाप्पाण्णा आवाडे शैक्षणिक संकुलच्या प्रांगणामध्ये हा बाजार मोठ्या उत्साहात भरविण्यात आला. बाजाराचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अभिजित कोथळी यांच्या हस्ते झाले. बाजाराचे स्वरूप पाहता शहरातील शुक‘वारचा आठवडी बाजार येथेच भरला आहे असे वाटत होते. बाजारात विविध भाज्या, फळे, कडधान्ये व मसाले यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी केलेली भाजी विक‘ेत्यांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. पालकांनी व प्रमुख पाहुण्यांनी या उपक‘माचे व्यवस्थापन , नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अनुभव व स्वावलंबनाचे धडे देणारा अशा प्रकारचा आठवडी बाजार भरविल्यामुळे अनंतराव भिडे विद्या मंदिरच्या मु‘याध्यापिका सौ. सुनीता केटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक होत आहे.