उपविभागीय अधिकारीसो (प्रांताधिकारी) इचलकरंजी विभाग इचलकरंजी, यांच्या कडे मागणी
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहराचे आमदार मा राहुल आवाडे यांनी नुकतीच मा जिल्हाधिकारीसो यांची भेट घेऊन पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढणे बाबत चर्चा केली होती. त्यास मा जिल्हाधिकारीसो पांनी तातडीने मान्यता दिली व गाळ काढणे कामाचा शुभारंभ तातडीने करणेत आला. तथापी गेल्या दोन दिवसात शेतकऱ्यांची नावे नोंद करून नदी पात्रातील वाळु उपसा करणेचे बेकायदेशीर काम जोरात सुरू असलेचे दिसत आहे. तशा आशयाच्या बातम्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत.
वस्तुतः या कामावर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक होते परंतू एका सहकारी सोसायटी कडे नावे नोंद करून हा उफराटा उद्योग चालु असलेचे दिसते. वस्तुतः मा आ राहुल आवाडे यांनी गाळ उपसा करणेची मागणी योग्य व व्यवहार्य होती त्यामुळे महापुराचा धोकाही कमी झाला असता. परंतु गाळ उपसा करणेच्या नावावर वाळु उपसा करून शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणेचे काम सुरू आहे का याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
सबब आपण तातडीने यामधे लक्ष घालुन वाळु उपसा करून शासनाचे महसुलाचे नुकसान करणाऱ्या प्रवृत्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व कामामधे हयगय करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी हि विनंती शशांक मल्हारराव बावचकर सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी निवेदन द्वारे केली आहे