प्रबोधिनीत ध्वजारोहण संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२७ समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लोकसत्ताक दिनानिमित्त प्रबोधन वाचनालयाचे अध्यक्ष शशांक बावचकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी शशांक बावचकर, प्रसाद कुलकर्णी, आनंदसा खोडे, पांडूरंग पिसे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळी प्रा.रमेश लवटे,बजरंग लोणारी, शकील मुल्ला, शहाजी धस्ते, उज्वला जाधव, भीमराव नायकवडी ,मनोहर जोशी सद्दामहुसेन कारभारी,सतीश कांबळे यांच्यासह प्रबोधिनीचे कार्यकर्ते व चंद्रशिला कॉमर्स अकॅडमीचे शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post