- दै.परतगंगा /दै.ग्रामदेवताचे संपादक श्री.सखाराम जाधव "निर्भिड पत्रकारांने सन्मानित."


प्रेस मीडिया लाईव्ह :

इंचलकरंजी - दै.परतगंगा /दै.ग्रामदेवताचे संपादक सखाराम जाधव यांचा "निर्भिड पत्रकार"म्हणुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.श्री साई सोशल फाउंडेशन व भीमाशंकर सौहार्द सहकारी संघ नियमित सदलगा यांच्या संयुक्त विद्यमाने किसान उत्सव 2025 निमित्त मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.

चिकोडी तालुक्यातील श्री साई सोशल फाउंडेशन व भीमाशंकर सौहार्द संघ नियमित, सदलगा या दोन संस्था अल्पावधीत सदलगा परिसरात लोकप्रिय ठरलेल्या आहेत. सर्व सामान्य जनतेला आर्थिक मदतीचा हात देऊन समाजाभिमुख काम करणारी संस्था म्हणून ही ओळखली जात आहे, ही संस्था प्रत्येक वर्षी सेवाभावी समाज उपयोगी कार्यक्रम घेत असते त्यातूनच यावर्षी किसान महोत्सव 2025 च्या आयोजनातून सदलगा परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा *निर्भीड पत्रकार सन्मान सोहळा* आयोजित केला होता.

प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून वृक्षाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्फ गजाभाऊ पाटील, माधवराव मधाळे, सौ. मंजुळाताई मधाळे ,सुरज मधाळे, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, सदलगा पूर्व भाग पि के पी एस चे संचालक बंडा तपकिरे, शहरातील नामांकित डॉक्टर सिद्धेश्वर भागाई ,माजी नगरसेवक राजू अमृतसंम्मनावर. यांच्या हस्ते परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी  यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले.

किसान महोत्सव कार्यक्रमांतर्गत संस्थापक महादेवरावजी मधाळे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थापक माधवराव माहादेवराव मधाळे यांनी संस्थेची वाटचाल संस्थेची प्रगती आणि केलेले समाज उपयोगी कार्य याचा आढावा घेतला आणि पत्रकार सोहळ्यासाठी उपस्थित सर्व  निर्भीड पत्रकार म्हणून निवड झाल्याबद्दल उपस्थित पत्रकारांचे हार्दिक अभिनंदन केले. परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेले पत्रकार अण्णासाहेब कदम, मकरंद द्रविड, तात्यासाहेब कदम, गजानन पाटील, अरुण संकपाळ, अजित कांबळे, अशोक दुर्गमर्गे ,सखाराम जाधव, संजय अवघडी, मुन्नाभाई नदाफ, अजित सुतार. या पत्रकारांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन *निर्भीड पत्रकार* म्हणून सत्कार करण्यात आला 

सत्कार नंतर अनेक पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करून साई सोशल फाउंडेशनचे आभार  मानून  धन्यवाद दिले. नैसर्गिक शेती या विषयावर चंद्रकांत शिंदे, भोज .यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षीय भाषणात सुरज मधाळे यांनी सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून *समाज मनातील सुखदुःख समाजासमोर सांगणारा सखा म्हणजे पत्रकार* या पत्रकारांना आमचे नेहमी सहकार्य असेल असे त्यांनी आवर्जून सांगितले आणि प्रत्येक वर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधून परिसरातील पत्रकारांचा सन्मान केला जाईल.असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन जेष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी केले तर सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी वीरुपक्ष हनीमनाळे, संतोष वासकर, आशिष हुद्दार ,राजेंद्र भोणे, गौडा बेळीकुरी, मल्लाप्पा घोबडे, आनंदा दानवाडे, प्रदीप कांबळे, अंजूम मुजावर, अवक्का रामनकट्टी, डॉक्टर सिद्धेश्वर भागाई, सचिन खोत, श्रुती कुंभार, शिवानंद घोबळे, प्रकाश हंचनाळे, दयानंद कमते, अल्लम प्रभू पोतद्दार, तात्यासाहेब केसे, संतोष सारापुरे ,आनंद हंचनाळे, अभिषेक रामनकट्टी, सुरेश कुंभार पिंटू देसाई बाबू शिंदे बाबू पिसाळ या कार्यकर्त्यांसह शेकडो स्त्री-पुरुष या कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे  आभार संस्थेचे सचिव श्रुती कमते यांनी मानले .

Post a Comment

Previous Post Next Post