प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्था ट्रस्ट इचलकरंजी व संयुक्त महिला मंडळ यांच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमच्या ठिकाणी ट्रस्ट सल्लागार समिती सदस्य श्री शंकर अगसर होते.
या वेळी अगसर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढें म्हणाले की आपल्या परिट समाजातील महिलानी पुढे येऊन पुरुषा बरोबरीने समाजाचे कार्य केले पाहिजे तरच महिला सक्षम होऊ शकतात.
आपल्या मनोगत मध्ये अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले जिजामाता झाशीची राणी फातिमा शेख असे अनेक वीर महिलांचे उदाहरणे दिले. त्याचबरोबर संत गाडगे महाराज यांचे विचार देखील आपण समाजामध्ये रुजवले पाहिजे आणि अशी सुरुवात आपण आपल्या घरापासूनच केली पाहिजेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या ट्रस्ट चेदुसरे , सल्लागार दर्याप्पा परीट हे लाभले त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव प्रकाश शिंदे महिला अध्यक्ष नयना पोलादे , उपाध्यक्ष रूपाली परीट सचिव शामबाला शिंदे यांनी परीश्रम घेतले