शिवछत्रपती पुरस्कार विजेत्याआंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाड
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल५५ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुण्या आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सौ.उमा भेंडीगिरी मॅडम व इचलकरंजी महानगरपालिका उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील मॅडम, यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसाद काटकर उपायुक्त ,रोशनी गोडे सहाय्यक आयुक्त, विकास खोळपे मुख्य लेखाधिकारी, नगर सचिव विजय राजापुरे, प्रशासनाधिकारी इरफान पटेल , शितल पाटील , क्रीडा अधिकारी सुर्यकांत शेटे ,प्रकाश मोरबाळे मा.उपनगराध्यक्ष ,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष वसंत सपकाळे , राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल विद्यार्थी विकास मंच अध्यक्ष सुनील मांगलेकर, सौ.अलका शेलार मॅडम मुख्याध्यापिका रवींद्रनाथ टागोर ,राजेंद्र घोडके पर्यवेक्षक,नेताजी बिरंजे, विजय हावळ, सुभाष कुराडे, जाफर जिडगे ,शंकर पोवार मुख्याध्यापक, पी.ए.पाटील जिमखाना प्रमुख तुषार जगताप तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
प्रथम पाहुण्यांच्या शुभहस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक शंकर पोवार सर यांनी केले. यामध्ये शाळेतील विविध उपक्रम आणि विकास खारगे साहेब यांचे मार्गदर्शन ,महानगरपालिका, माजी विद्यार्थी , रवींद्रनाथ टागोर इ.सर्वांचे सहकाऱ्यांनी शाळेची प्रगती करीत आहोत.
यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय पी.ए. पाटील सर यांनी करून दिला. यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यानंतर मान्यवरांची मनोगते झाली यामध्ये प्रसाद काटकर साहेब उपायुक्त यांनी आपल्या मनोगतामध्ये यापूर्वी महानगरपालिका शिक्षण विभागाकडे जास्त लक्ष दिले जात नव्हते पण ओमप्रकाश दिवटे आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आज सर्व शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केलेआहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे ही विशेष लक्ष दिले आहे .त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी थ्री इडियट्स चित्रपट पाहावा त्याचा बोध घ्यावा. तसेच सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.उमा भेंडीगिरी मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये इयत्ता पाचवी पासून कबड्डी खेळायला सुरुवात केली. आपल्या आवडीचा खेळ निवडा.एकच गेम निवडला पाहिजे आणि त्यामध्ये खूप मेहनत करा. मातीवर, कोचवर ,:शिक्षकांवर, आई वडिलांवर श्रद्धा ठेवा. सकस आहार घ्या . फास्ट फूड टाळा. आमच्या काळात मोबाईल नसल्यामुळे आमची प्रगती झाली. त्यामुळे मोबाईलचा वापर तुम्ही कमी करावा. प्रो कबड्डी पहा. अनेक विद्यार्थ्यांचे खेळामधून करिअर झालेले आहे व ते आज मोठमोठ्या पदावर शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती पाटील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक यांना शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांनी आई वडील यांच्या आज्ञा पाळा. शाहू हायस्कूलच्या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्कृष्ट असते त्यामुळे आम्हाला शाळेच्या कार्यक्रमाला यायला सुद्धा अतिशय आनंद होतो. आपण सर्व विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहोत त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करून आपले ध्येय साध्य करा.यानंतर विशेष सन्मान करण्यात आले.यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
श्रेयश साठे
अथर्व लायकर
कु. यश साळुंखे
कु. सई शिंदे
लोकनृत्य स्पर्धा
कु.सिद्धी मुसळे ,
कु.श्रावणी भागवत
कु.नंदिनी पाटील
कु. प्रतीक्षा कांबळे
कु. वेदिका माने
माजी विद्यार्थी आर्यवर्धन नवाळे पुणेरी पलटण प्रो- कबड्डी खेळाडू ,वॉचमन संजय महाजन यांचा स्वेच्छा निवृत्ती निमित्त सन्मान करण्यात आला.त्यानंतर वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी. ए. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सौ.यु.पी.जाधव यांनी केले.
मुख्याध्यापक
राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल
इचलकरंजी महानगरपालिका