श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्यावतीने नदी किनारी दरवर्षीप्रमाणे गणेश जयंतीनिमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (ता.२५) ते रविवार (ता.२) या कालावधीत सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, आरोग्य तपासणी शिबिर यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. 

शनिवारी सकाळी सकाळ सव्वा आठ वाजता उत्सव मूर्तीचे पूजन, दीपप्रज्वलन श्री ज्ञानेश्वरी पारायण शुभारंभ माजी नगराध्यक्षा अँड सौ. अलका स्वामी यांच्या शुभहस्ते होणार आहे. १ तारखेला अध्यक्षस्थानी बाळासाहेब जांभळे तर माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष द्वारकाधीश सारडा यांनी प्रमुख उपस्थिती असणार आहे.सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाचे यंदाचे हे ३२ वे वर्ष आहे.

गणेश जयंती कालावधीत दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. पारायणाचे व्यासपीठ प्रमुख ह.भ.प. सदाशिव ढुंडाप्पा उपासे महाराज असतील. तसेच दुपारी चार ते सात श्री माऊली भजनी मंडळ, 

रांगोळी अमृतधारा बाळ भजनी मंडळ, रेंदाळ

श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळ, महादेवी कित्तुरे, इचलकरंजी

श्री बाळ अवधुत भजनी मंडळ, बंजरग ओतारी, इचलकरंजी.

श्री दत्त भजनी मंडळ, कबनूर

श्री सिध्दीविनायक भजनी मंडळ, आसरा नगर

श्री तुळजाभवनी महिला भजनी मंडळ, तांबे माळ

यावेळेत या विविध महिलांसह अन्य भजनी मंडळांचे भजन आयोजीत केले आहे. जयंतीदिनी १ फेब्रूवारीला सकाळी साडेआठ वाजता श्रींची सहस्त्रावर्तने, सजली १० ते १ यावेळेत मारवाडी युवा मंच मिटडाऊन यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. याचवेळी सकाळी सव्वादहा वाजता सौ. राधिका कालेकर कोल्हापूर यांचे गणेश जन्माचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ त्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्री सप्तश्रृंगी महिला भजनी मंडळाचे भजन, साडेसहा वाजता दिपोत्सव आणि सायंकाळी सात वाजता महाआरती होणार आहे. 

2 फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताह सांगता सोहळा होईल आणि सकाळी ११ वाजता महाप्रसादाने जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. हे सर्व भरगच्च कार्यक्रम पंचगंगा नदी किनारी श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर परिसरात होतील. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी व उत्सव समितीने केले आहे.

----

Post a Comment

Previous Post Next Post