महापालिकेतील सफाई कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वारसा हक्काच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात यश

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : महापालिकेतील सफाई कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वारसा हक्काच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात यश मिळाले आहे. सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला आहे. या निर्णयाचा लाभ संपूर्ण राज्यातील सफाई कामगार कुटुंबांना होणार आहे*.

तत्कालीन नगरपरिषद आणि महापालिकांमध्ये कार्यरत सफाई कर्मचार्‍यांना वारसा हक्काने नोकरीत स्थान मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी सतत पाठपुरावा करण्यात आला*.

माजी मंत्री मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर मांडला आणि तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने वारसा हक्काच्या नियुक्तीसाठी अध्यादेश जारी केला आहे*.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले*.

यावेळी रवी जावळे, धोंडीराम जावळे, राजू रजपुते, शांताराम लाखे, अशोक लाखे, संतोष लाखे, दत्तात्रय जावळे, विठ्ठल जावळे, संजय लाखे, शाहीर जावळे, उमेश लाखे, विजय जावळे, महादेव जावळे, अंकुश लाखे हिंदुराव जावळे जमीर जमादार, धनपाल जावळे, अरविंद खोडवी, शाहीर जावळे, अशोक द लाखे, मोहन लाखे, भोपाल लाखे, प्रकाश जावळे, धोंडीराम अ जावळे, अभिजीत जावळे, भगवंत आवुधकर, आकाश लाखे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post