देहुरोड येथे परभणी प्रकरणी व अमित शहा यांनी बाबासाहेब बदल बेताल वक्तव्य केल्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चा.

 देहूरोड सुभाषचंद्र बोस ऐतिहासिक चौकात जोरदार निदर्शने, संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजीने अवघे शहर दुमदुमून गेले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

 देहूरोड दि. ११ :- सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याने देहूरोड शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती सर्व पक्षाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला.





सर्व प्रथम देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सहभागी झालेल्या महिलांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोर्च्यात भिमसैनिकांनी निषेध म्हणून तडीपार अमित शहा असे लिहलेल्या फलक हातात घेऊन नीळे झंडे फडकावित निषेध व्यक्त करत अमित शहा विरोधात घोषणाबाजी केली "या अमित शहा चे करायचे काय खाली डोके वर पाय" "अमित शहानी राजीनामा दिलाच पाहिजे" "अमित शहा वर देशद्रोह चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे" "जो भिम से टकराऐगा वो मिट्टी में मिल जाऐगा" असे जोरदार घोषणाबाजी करत विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

 हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून जुने मुंबई पुणे महामार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत हा विराट मोर्चा सवाना उपहारगृह वृंदावन चौक भाजी मंडई करत देहुरोडच्या ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे येताच परत जोरदार घोषणाबाजी करत "संविधानाचा विजय असो" "डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या विजय असो" "शहानी राजीनामा दिलाच पाहिजे", "शहावर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे", पोलीस मारहाणीत पोलीसांनी खोटे बतावणी करत सुर्यवंशी ला मनोरुग्ण ठरविले त्या "डॉक्टराचे ड्रिग्री कैंसल करून कायमस्वरूपी बंड तर्फे करण्यात यावे" "पोलीसांवर ही ३०२ चा गुन्हा दाखल करून फाशी दिली पाहिजे" असे जोरदार घोषणाबाजीने सुभाषचंद्र बोस चौक घोषणाबाजी ने दुमदुमून गेले.   

वेळी प्रस्ताविक मध्ये अरविंद गायकवाड यांनी आज सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणी आज आपण या विराट मोर्चा मध्ये सहभागी झाले व सर्व पक्षीय एकत्रित येऊन हे निषेध व्यक्त करत आहेत मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचे निषेध व्यक्त करतो आणी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करतो असे प्रस्ताविकेत सांगितले. जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण यांनी जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अवमान करतात अशा तडीपार गृहमंत्री चे तात्काळ राजीनामा मागितले पाहिजे तुम्ही ज्या संविधानावर शपथ घेऊन देशाचे गृहमंत्री होता आणि त्याच संसदेत तुम्ही बाबासाहेबांचे अपमान करता हे लाजिरवाणी गोष्ट आहे परभणी मध्ये सूर्यवंशी यांच्या खून झाला त्या सर्व पोलिसांना बंडतर्फे करा व अमित शहा यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा असे जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनाचे जेष्ठ नेते रमेश जाधव यांनी ज्या संसदेवर आपण निवडणूक लडवुन संसदेत पाऊल ठेवता आणी ज्यांनी घटना लिहले त्या महामानवाने अपमान करता असे गृहमंत्रीला संसदेत बसण्याचा अधिकार नाही अमित शहा यांना पदावरून पायउतार केले पाहिजे तसेच सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी जे कोणी डाॅक्टर पोलीस दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला.

यावेळी महिला नेत्या अर्चना राऊत यांनी संताप व्यक्त करत भारत देश एक लोकशाहीचा देश आहे देशात अनेक कायदेतज्ज्ञ कायदेपंडित सुरक्षित लोक आहेत पण आपले देशात एक तडीपार माणुस गृहमंत्री होतो हे देशाचे दुर्भाग्य आहे आणि अशा माणसाला आपण स्विकारतो आणि हेच माणुस संसदेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान करतो डॉ बाबासाहेब आंबेडकर हे काय आहेत ते अख्या जगाला माहीत आहे ते तुम्ही आम्हाला शिकवू नका असल्या माणसाला पदावर राहण्याचा अधिकार नाही अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे जीव घेतले त्या पोलीसांवर ३०२ चा गुन्हा दाखल करून त्यांना बंडतर्फे करा आणि ज्या भिमसैनिकानवर खोटे गुन्हा दाखल झाले आहेत ते त्वरित मागे घ्यावे असे जोरदार टिका करत निषेध व्यक्त केला.

जेष्ठ नेते संजय आगळे यांनी परभणी प्रकरणी महाराष्ट्रात घडलेली सर्वात दुःखद घटना आहे एका सुशिक्षित माणसाला मनोरुग्ण ठरविले जात आहे सोमनाथ सूर्यवंशी हे वकिली करत होते फक्त चित्रिकरण करत असल्याने त्याला अटक करून कोर्टात हजर केलं न्यायालयाने त्याला न्यायालियन कोठडी सुनावली होती न्यायालियन कोठडी असताना पोलीसांनी कसे काय मारहाण केली अशी जबर मारहाण केली कि त्याचे प्राणच गेले आणी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे बाबासाहेब बदल अपमानास्पद भाषेचा वापर करून बाबासाहेबांचे अपमान करत आहेत असले गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे व त्याचावर देश द्रोहीचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे मत मांडुन निषेध व्यक्त केला.

भारतीय संविधान समिती च्या वतीने डॉ रामदास ताटे यांनी जोरदार टिका शस्त्र सोडत अमित शहा ज्या पदावर बसलेले आहे ते बाबासाहेब यांच्यामुळे आहे आणि ज्यांच्यामुळे तुम्ही संसदेत बसता त्याच संसदेत तुम्ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य करता असे मनोरुग्ण गृहमंत्र्यांनी आपला पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि शहावर अट्रोसिटी सह देशद्रोह चा गुन्हा दाखल झाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी जे जे लोक दोषी आहेत त्या सर्वांना बडतर्फ करा आणि पोलीस कोठडी मारहाण केल्याने मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी हत्या बदल पोलीसांवर ३०२चा गुन्हा दाखल करून त्यांना फासावर लटकावा असे जोरदार मागणी केली 

यावेळी महिलांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला आणी अमित शहा यांच्या फोटो प्रतिमेला पायानी तुडविले व जोरदार घोषणाबाजी केली.

 यावेळी अनेक पक्ष संघटनेच्या सामाजिक नेत्यांनी सुर्यवंशी प्रकरणी पोलीसांवर गुन्हा दाखल केले पाहिजे तसेच अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे असे एकमुखी मागणी केली डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती चे निवेदन स्विकारण्यासाठी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी निवेदन स्वीकारले तर निगडी ग्राम महसूल अधिकारी सोनम वाबळे यांनी निवेदन स्वीकारले या विराट मोर्चामध्ये मानव आधार संघटना सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांनी भाग घेतला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धर्मपाल तंतरपाळे व प्रकाश कांबळे रुईकर यांनी केले तर आभार प्रकट परशुराम दोडमणी यांनी मानले.

यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचा वतीने सुरक्षाव्यवस्था चौख ठेवण्यात आली होती पोलीस वाहन सह पोलीस कर्मचाऱ्यांचे ताफा सह अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post