मुलीनी स्वतः चे सरंक्षण करण्यासाठी ज्युडो कराटे मार्शल आर्ट शिकणे काळाची गरज :- डॉ रामदास ताटे
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे ;
देहूरोड दि. :- देहूरोड थाॅमस काॅलनी येथे कराटे बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट खेळाडुंना विविध प्रकारचे बेल्ट प्रदान करण्यात आले
यशराज स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत यशराज मार्शल आर्ट पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या अंतर्गत देहुरोड थॉमस कॉलनी, येथील यशराज मार्शल आर्टस या संस्थेच्या मुख्य शाखेच्या वतीने यात ७० विद्यार्थीनींनी भाग घेतला होता त्यापैकी ५६ विद्यार्थीना ८ कलर बेल्ट, ८ ब्राऊन बेल्ट व ६ विद्यार्थीनीं ब्राऊन ब्लॅक प्राप्त केले तसेच एक विद्यार्थीला १ दान ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. या मार्शल आर्ट बेल्ट प्रदान कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ रामदास ताटे हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
यावेळी अनेक खेळाडुनी प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थित मान्यवरांचे मने जिंकली यावेळी डॉ रामदास ताटे यांनी खेळाडुंना संबोधित करताना आपले आठवणीला उजाळा देत म्हणाले एके काळी मी ही विद्यार्थी होतो श्री शिवाजी विद्यालयात शिकत असताना मी ही ज्युडो कराटे मार्शल आर्ट चे धडे घेतले होते आज तुम्हाला पाहुन माझे जुने आठवणी परत जागे झाले मार्शल आर्ट हे एक कला नसुन ते आपले स्वतःचे संरक्षण करण्याचे साधन आहे आजच्या काळात यांची खुप गरजेचे आहे खास करून प्रत्येक मुलीनी हे शिकले पाहिजे व आपले बचाव स्वतः करणाचे शिकले पाहिजे सर्व पालकांनी आजच्या युगात मुलीना शिक्षण देत असताना ज्युडो कराटे लाठीकाठी चे प्रशिक्षण दिले पाहिजे असे महत्वपूर्ण गोष्टीचे विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.
या मार्शल आर्ट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या ब्राऊन बेल्ट विद्यार्थी यांचे नावे पुढीलप्रमाणे
1) कार्तिक रेड्डी 2) मनवीर सिंग, 3) अनन्या वेताळ, 4) मानसी मेहेर 5) दर्श राऊत, 6) आराध्य बघते, 7) श्रीशा कुलकर्णी, 8) गरिमा यादव यांना बेल्ट प्रदान करण्यात आले. तर
ब्राऊन ब्लॅक बेल्ट मध्ये
1) अपूर्वा अंतिल, 2) त्रिशा मेहता, 3) भक्ती लुंमधे, 4) मलव शहा,
5) अनन्य वेताळ, 6) रचित साई यांना प्रदान करण्यात आले.
विशेष म्हणजे खेळाडू आराध्या अमित जैन या विद्यार्थिनीला ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्री प्रदान करण्यात आला. खेळाडू आराध्या गेले पाच वर्षापासून संस्थेत कराटेचे प्रशिक्षण घेत आहे
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र के नाईन न्युज साप्ताहिकचे डॉ रामदास ताटे यांच्या हस्ते खेळाडुंना बेल्ट प्रदान करण्यात आले. डॉ उज्वला रवींद्र भेगडे ( बी ए एम एस) या उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमात खेळाडुंचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे मुख्य प्रशिक्षक व पिंपरी चिंचवड केम्पो असोसिएशन चे अध्यक्ष नितीन के.वैरागर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सर्व ब्लॅक बेल्ट स्वाती वैरागर, धनश्री वैरागर, कपिल सारसर, ओमकार लुमधे, यशराज वैरागर् ,स्वराज तांदळे यांनी केले.
यशराज मार्शल आर्टस मागील पंचवीस वर्षापासून पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना आत्म संरक्षणाचे धडे देत असून विद्यार्थ्यांनी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुण प्राप्त केलेले आहे. संस्थेच्या वतीने आतापर्यंत १५० विद्यार्थी ब्लॅक बेल्ट म्हणून उत्तीर्ण झाले आहे.तसेच अनेक आय टी पार्क मध्ये त्याच प्रमाणे केंद्रीय विद्यालय (देहूरोड,) मामासाहेब खांडगे स्कूल (तळेगाव दाभाडे.) आज इंग्लिश मीडियम स्कूल अशा अनेक ठिकाणी मुलींना मार्शल आर्ट संरक्षणाचे व मर्दानी खेळाचे मार्गदर्शन करत आहे .तसेच संस्था महिला दिनानिमित्त , महिलांना मोफत योगा प्रशिक्षण संरक्षणाचे धडे आणि फिटनेस याचे महत्वपूर्ण काम बजावत आहे.