डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात समितीच्या वतीने रुग्णांना चहा बिस्कीट वाटप.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे
देहूरोड भारतीय संविधान सन्मान संयोजन समिती वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालया येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार येथील संविधान फलकास समितीचे अध्यक्ष डॉ रामदास ताटे व समन्वयक मोझेस दास यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले .
तर कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीचे खजिनदार विजय पवार व सह खजिनदार बाबु हिरमेठकर यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर धुपदिप अगरबत्ती,मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले भारतीय संविधान सन्मान समिती चे अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी उपस्थित लोकांना संबोधित करण आपले मनोगत व्यक्त करत प्रजासत्ताक दिनाची माहीत देत भारतीय राज्यघटनेची माहीती दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन सर्व भारतीयांना एकासुत्रात बांधले आहे सर्वांना समान कायदा दिला कोणीही अमीर गरीब नसुन कायदा सर्वाना समान आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटना लिहणसाठी एक वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते पुर्ण झाल्यावर डॉ बाबासाहेबानी २६ नवंबर १९४९ साली देशाला प्रदान केले आणि २६ जानेवारी १९५० रोजी कायदेची अंमलबजावणी सुरू झाली. आज बाबासाहेबांचे संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान मानले जाते असे संविधानाची माहीत उपस्थित समन्वयक पदाधिकारी सदस्य उपस्थित लोकांना दिली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो प्रजासत्ताक दिन चिरायू होवो अशी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या तदनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना कर्मचाऱ्यांना व सुरक्षा रक्षकांना चहा बिस्कीट खाऊ वाटप समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीनिवास चाटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी डॉक्टर श्रीनिवास चाटे यांनी रुग्णालयात रूग्णांनसाठी उच्च प्रकारचे नवीन बेड उपलब्ध करून दिले तसेच ओपीडी साठी नवीन बांधकाम सुरू आहे त्यात महिला पुरुष साठी वेगवेगळ्या खिडकी व बील भरण्यासाठी ही महिला पुरुषानसाठी दोन खिडक्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे माहीत समितीला दिले तसेच पाणी टंचाई मुळे गुरूवार शनिवार रविवार पाणीची समस्या उद्भवत असल्याने चार हजार लिटर पाणी ची टाकी बसविण्यात येत असल्याचे ही माहिती दिली तर सद्या दोन हजार लिटर चे पाणी टाकी लावण्यात आले आहे अशी माहिती समन्वयकांना दिले आहे यावेळी समितीच्या वतीने दोन हजार लिटर पाणी टाकी समितीच्या वतीने लावण्यात येईल असे घोषित केले.
यावेळी समितीचे मुख्य समन्वयक व जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, समितीचे अध्यक्ष डॉ रामदास ताटे, खजिनदार विजय पवार,सह खजिनदार बाबु हिरमेठकर समितीचे सचिव परशुराम दोडमणी, समन्वयक मोझेस दास, सहसचिव चंद्रशेखर पात्रे (पत्रकार) सदस्य अरूण ढेकणे सदस्य इरप्पा तेलगु , जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण, सुनिल गायकवाड , अशोक चव्हाण, भरत नायडू, सीताराम मांझी, अमित छाजेड, अहमद शेख, इंद्रपालसिंग रत्तू उर्फ कुक्की, बाळु जगताप, राहुल गायकवाड, सिद्धार्थ दोडमणी आदि उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत शिवशरण सुनिल गायकवाड व त्यांचे सहकारी रुग्णालयात लावण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान प्रदानाचे मोठे प्रतिमा फोटो डॉक्टर श्रीनिवास चाटे यांना प्रदान केले.