भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शहर व साऊथ इंडियन सोसायटी विश्डम इंग्लिश मीडीयम च्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा.

 विद्यार्थीनींनी संविधानाची माहीत देत विविध कलाकौशल्य दाखवून केले सर्वांना मंत्रमुग्ध.


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहुरोड दि. २७ :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर शाखा महिला व पुरुष कार्यकारिणी,समता सैनिक दल व धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था यांच्यावतीने  देहूरोड येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात  साजरा करण्यात आला, 


याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे पुणे जिल्हा प्रमुख तथा लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली,

तदनंतर धम्मसदन शितळानगर देहूरोड येथे सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने देहूरोड शाखा अध्यक्ष संजय आगळे व धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष के एच सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सामुदायिक राष्ट्रगीत घेण्यात आले,

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बुद्ध महासभा देहूरोड शाखा अध्यक्ष संजय आगळे यांची नियुक्ती करण्यात आली, सर्वानुमते अनुमोदन  देहूरोड शाखा संस्कार सचिव राकेश आवाड यांनी दिले, 

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांचे दीप धूप,पुष्पांनी पूजन करून संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे व संगीता बनसोडे यांच्या वतीने सुत्तपठ्ठण घेण्यात आले,

याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा सरचिटणीस प्रकाश कांबळे यांनी संविधानाच्या ऊद्देशिकेची उपस्थित बांधवाद्वारे प्रतिज्ञा घेण्यात आली,

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित पदाधिकारी संगीता बनसोडे, छाया शिंदे,आशा माने, आशा गायकवाड, उषा वाव्हळे,सु.भा.पवळ,ऊत्तम हिंगे,के.एच.सुर्यवंशी इत्यादी मान्यवरांनी  शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले, 

याप्रसंगी पुणे जिल्हा पश्चिम संरक्षण उपाध्यक्ष सुखदेव वाहुळे सचिव राजेंद्र बडेकर, संरक्षण उपाध्यक्षा आशाताई गायकवाड ,समता सैनिक दलाचे सिनीयर डिव्हिजन ऑफिसर अजय जाधव, कंपनी कमांडर अशोक कदम, संजय आगळे,मनोज वाकोडे सह सैनिक प्रमोद शेगोकार,निलम काकडे,आशा माने,अनिकेत शेगोकार, इत्यादी पुरुष व महिला सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच देहूरोड शाखा पदाधिकारी छाया शिंदे, नीलम काकडे, ताराबाई भालेराव, हिराबाई राक्षे,सुनील वाव्हळे, संग्राम वाव्हळे इत्यादी महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा सरचिटणीस प्रकाश कांबळे  यांनी केले, तर आभार  महिला कोषाध्यक्षा आशा माने यांनी मानले व सरणत्तय घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

*विस्डम इंग्लिश मीडीयम हायस्कूल च्यावतीने झंडा वंदन* 

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी 

विकासनगर, किवळे, देहूरोड येथे साउथ इंडियन असोसिएशन सेठ एच् ए बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मिडीयम हायस्कूल ( साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित )  शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने  देशभक्ती वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाच्या वेळी साउथ इंडियन असोसिएशनचे आश्रय दाता (पेट्रान) माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे संस्थेचे अध्यक्ष  जयशंकर जयसिंग उपाध्यक्ष  वेंकटाचेलापती संस्थेच्या महासचिव  पार्वती बाबू खजिनदार  जेकब  नाडार तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका  गायत्री धामणेकर व सहमुख्याध्यापिका  शेरीन कुरीन शाळेचे उपाध्यक्ष  के के पिल्ले विश्वस्त  एस डेव्हिड नाडार, पी हेमंत कुमार,  टि जे थॉमस, मनोज संक्राती, संबत भोईटे आणि समाजसेविका शुभांगीताई वानखेडे माजी नगरसेविका कु.प्रज्ञाताई खानोलकर समाजसेवक  निलेश तरस,धर्मपाल तंतरपाळे, तुषार तरस व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. साउथ इंडियन असोसिएशनचे उपाध्यक्ष  वेंकटा चेलापती यांनी ध्वजारोहण केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथ संचलनाचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. 

शाळेचे प्रमुख मुलगा स्वराजसिंग देवेंद्रसिंग संधू, प्रमुख मुलगी नीलू रामसबत यादव यांनी संविधानाचे वाचन केले. इयत्ता १ली तील तहमित जावेद पठाण या विद्यार्थ्याने प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती देत मागील इतिहास सांगितले   इयत्ता ७वी तील मृणाल राजेंद्र कांबळे यांनी आपले देशाचे संविधान लिहण्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान हे एक वर्ष अठरा महिने मध्ये पुर्ण केले १९४९ ला देशाला प्रदान केले आणी २६ जानेवारी १९५९ रोजी अमलात आले असे सुंदर माहिती विद्यार्थिनीने संविधानाची   माहिती दिली. यावेळी शाळेकरी मुलांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच देशभक्ती गीतांवर विविध नृत्यप्रकार व कवायती सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले इयत्ता २री तील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यां मध्ये देशभक्तांविषयी आदर व स्वतंत्र सेनानीनी केलेला त्याग तसेच देशप्रेम कसे निर्माण व्हावे या उद्देशाने  देशातील थोर देशभक्तांची वेशभूषा धारण करून त्यांची प्रसिद्ध वचने सादर केली 

यावेळी विद्यार्थ्यांनी ज्यदो कराटेचे विविध प्रात्यक्षिके सादर केले तर काही विद्यार्थी कवायत करून दाखविले या आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाळेतील विविध क्रीडा प्रकारातील  विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रदान करून विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच  शाळेतील इयत्ता दहावी शिकत असलेल्या कु. अनुष्का अनिल पवार हिला उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून पारितोषिक देण्यात आले. शाळेतील उत्कृष्ट हाऊस याची घोषणा करण्यात आली  येलो हाऊसने प्रथम क्रमांक पटकावला विघ्नेश सुभाष नावडकर यांनी येलो हाऊस वतीने पारितोषिक स्वीकारले. ग्रीन हाऊस ने दुसरा क्रमांक पटकावला समर्थ संदीप हटकर यांने ग्रीन हाऊस च्या वतीने  पारितोषिक स्वीकारले. प्रमुख पाहुण्याने आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतातील विविधतेतील एकता याविषयी तसेच जगात आपले संविधान कसे उत्कृष्ट आहे याची माहिती दिली.  कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले गेले.

Post a Comment

Previous Post Next Post