प्रजासत्ताक दिनानिमित्त देहुरोड शहरात विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्ष यांच्या वतीने राष्ट्रध्वजाला दिली मांवनदना

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात , बोर्डाच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे आले. 

शहराच्या नागरिसमस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध. - मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत 

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड:- देहूरोड शहरात विविध सामाजिक संस्था संघटना व राजकीय  पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थित ७६ व्या   भारतीय   प्रजासत्ताक दिनानिमित्त ,देहूरोड पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने सलामी दिल्या नंतर  मुख्याधिकारी  पुष्पांजली रावत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महात्मा गांधी विद्यायातील विद्यार्थिनी तसेच

 




चिंचोली  येथील मराठी शाळेची  विद्यार्थीनी अमृता साठे, हिने मराठी मध्ये तर  अहेनशान इम्रान खान याने  हिंदी मध्ये देशभक्तीपर  भाषणं देऊन सर्वांना स्वातंत्र्य पूर्व काळाचा आठवण करून दिली. एम बी कॅम्प शाळेची विद्यार्थिनी वर्षा पवनसिंग कल्याणी  आणि हिने  देशभक्ती पर शेरोशायरी करत ,देशासाठी बलिदान दिलेल्या देशभक्तांची आठवण करून उपस्थितांची  मने जिंकली. 

यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना  सांगितले की , आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा ७६ व्या   प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत .२६  जानेवारी १९५०  रोजी आपल्या देशात संविधान लागु झाले आणि  समता बंधुता एकता स्वतंत्रता न्याया या सारखे अधिकार  संविधानाने आपल्याला  दिले आहेत. डॉ भीमरावजी आंबेडकर आणि अन्य  नेत्यांच्या प्रयत्नाने  आपल्याला संविधान मिळाले आहे. आज जे काही नवीन नियमावली कायदे व दस्तावेज बनवले जातात हे केवळ दहा वर्ष कालावधी पर्यंत मर्यादित असतात. वेळेनुसार यात बदलही करावे लागतात , पण संविधान एक अशी गोष्ट आहे ते कधीच  बदलु शकत  नाही .आज एवढे वर्ष झाले तरी आजही  आपले देश या संविधानावर पुढे चालला  आहे,आणि पुढेही चालत राहणार आहे. गणतंत्र दिवस म्हणजे  स्वातंत्र्यासाठी  बलिदान देणाऱ्या ,आणि  संघर्ष करणाऱ्या, स्वातंत्र्यासाठी   आपल्या प्राणांची  आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य वीरांची आठवण करून देणारा हा दिवस आहे.आपण यापासून  प्रेरणा घेतली पाहिजे. मला इथला पदभार स्विकारून एक वर्ष पूर्ण होत आहे. आजपण देहुरोड वासीयांना वीज, पाणी ,रस्ते,  विकास यापासून  वंचित रहावे लागत आहे.एसआर आणि खासदार आमदार यांच्या निधी मधून ही कामे करावी लागत आहेत. इथलया नागरिकांना लवकरात लवकर  सर्व सोयी  सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. चिंचोली, किन्हईगाव, झेंडेमळा या ठिकाणी रस्ते पाणी वीज आदी  अनेक  समस्या आहेत. लवकरच यावरती उपाययोजना केल्या जातील.तसेच  शेलारवाडी येथील शाळा लवकरच सुरू करण्यात येईल. शाळा तयार आहे परंतु  शौचालय पाणी यासाठी काम थांबले आहे ,ते ही लवकरच पूर्ण करण्यात येईल. छावणी मंडळाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना  नवीन सुख सुविधा व नवीन कपडे देण्यात येणार आहेत.. आज कॅन्टोन्मेंट बोर्डाची परिस्थिती बिकट आहे आमदार खासदार सामाजिक संस्थेच्या वतीने थोडे फार मदत मिळत आहे तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डात काम करणारे कर्मचाऱ्यांचे सुख सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे कॅन्टोन्मेंट रुग्णालयात देखील सुख सुविधा उपलब्ध करून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे तसेच बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी जागा अपुरी पडत आहे तसेच पार्किंग साठी जागा उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे . यासाठी व्यापारी व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करणे  आवश्यक आहे.देहूरोड शहरात अनाधिकृत होर्डिंग्ज चे प्रमाण खूपच वाढले आहे बेकायदा होर्डिंग्ज लावण्यात येत आहे याबाबत अनेक तक्रारी.आल्या आहेत.  काही सामाजिक संघटनां व नागरिकांच्या बरोबर चर्चा देखील करण्यात आली आहे . जे काही शुल्क असेल ते आकारावे असे त्यांनी सांगितले आज ,यामुळे  कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या तिजोरीत भर पडणार आहे. याबाबत लवकरच बोर्ड मिटींग मध्ये हा विषय  घेण्यात येणार असून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे, आजचा दिवस हा  आंनदाचे दिवस आहे असे सांगून त्यांनी , भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक  देहूरोडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे देहूरोड बाजार असोसिएशन कमिटीच्या वतीने आशीष बंसल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विभागाचे सदस्य व गुरू सिंग सभा गुरुद्वारचे अध्यक्ष गुरमीत सिंग रत्तु यांच्या हस्ते झेंडा  फडकाविण्यात आला. यावेळी उपस्थित लोकांना गुरमीतसिंग रत्तु यांनी शुभेच्छा देत आभार प्रकट करत म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्व जाती धर्म पथंला एकसुत्रात बांधले आहे. कोणी छोटा मोठा नसुन सर्वांना एकसमान न्याय,हक्क  या संविधानाने दिला आहे. प्रथम  जेष्ठ नेत्या गंगुबाई  खळेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावर्षी प्रथमच नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे सुभाषबाबू यांचा पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. राष्ट्रीय उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल व्यव्हारे यांनी स्वखर्चाने सुशोभीकरण केले आहे.  यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक। अधिकारी ऍड. कैलास पानसरे.आणि  देहूरोड शहरातील सर्व सामाजिक, शैक्षणिक , राजकीय ,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार येथे त्रिशुळ मित्र मंडळाच्या वतीने ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी विद्यालयाच्या  विद्यार्थीनी राष्ट्रगीत गाऊन मानवंदना दिली. यावेळी अध्यक्ष शंकर तलारी ,कार्याध्यक्ष धनंजय मोरे प्रशांत सामद्री, शंकर मंचल, आशीष मालगी आदी उपस्थित होते.

 देहूरोड तलाठी कार्यालय येथे मल्याळम समाज संघाच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी या  समाजाचे अध्यक्ष जी. बी.नायर सेक्रेटरी दामोदर विजु,चेअरमान , मोहन यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.  संस्थेचे राधाकृष्णन् बाबु,रवी शिवन रणजीत,अंबिला सज्जी आचार्य,संध्या हे उपस्थित होते. वृंदावन चौक येथे नरसम्मा देगडमली या जेष्ठ महिलेच्या  हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उत्तम नागोजी राव, टी शेकन्ना, जावेद शकिलकर यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी मनसेचे नेते मोझेस दास, शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख दिपक चौगुले, जेष्ठ नेते जलालभाई शेख, परशुराम दोडमणी, जेष्ठ नेते हिरामण साळुंखे, संदिप बहोत, मानव आधार सामाजिक संघटनांचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन चे जिल्हा सेक्रेटरी चंद्रशेखर पात्रे, इरप्पा तेलगु, शालीन चौगुले, गंगु बाई खळेकर विद्या ढिलोढ मुर्तीं भाभी आदि उपस्थित होते. गांधीनगर झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमूतू यांच्या अध्यक्षतेखाली मालनबाई राजाराम भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला चिंगरू पवार तर बाबासाहेब यांच्या प्रतिमेला लक्ष्मण चोखजी यांनी पुष्पहार अर्पण केला.

बॅंक ऑफ इंडिया येथे श्री साईबाबा प्रतिष्ठान च्या वतीने साई प्रतिष्ठान चे अध्यक्ष व फोटोग्राफ असोसिएशनचे अध्यक्ष बाबु टेक्केल यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण  करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सहाएक पो.नि. लखनकुमार वाव्हळ यांच्या हस्ते पुष्पहार  अर्पण करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पीएसआय सावंत वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वेळी राहुल सपकाळे ,सुभान शेख स्वप्नील तंतरपाळे आदि उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार स्वामी विवेकानंद चौक येथे रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष शंकर दोडमणी यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नेते राजाराम अस्वरे दादा यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post